महापालिकेसाठी भाजप मेरिट बघूनच उमेदवारी देणार

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजयुमो शहर- ग्रामीण विभागाच्या बैठकीत माहिती दिली.
महापालिकेसाठी भाजप मेरिट बघूनच उमेदवारी देणार
Chandrashekhar BavankuleSarkarnama

नाशिक : येत्या काळात महापालिकांच्या (NMC) निवडणुका होणार असून, या निवडणुका राज्यातील (Maharashtra) सत्तेचा कल दर्शविणार आहे. त्यामुळे युवकांना स्वतःला झोकून देवून काम करावे. महापालिका निवडणुकीत युवा मोर्चा कार्यकर्ते पक्षाचे बॅकबोन आहे. त्याचप्रमाणे उमेदवारी देताना मेरिट बघून निवडणूक लढविण्याची संधी दिली जाईल, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी सांगितले. (BJP will give priority to youth in upcoming elections)

Chandrashekhar Bavankule
शरद पवारांवर निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

ते म्हणाले, राज्यात १८ ते २५ वयोगटातील २५ लाख युवा वॉरिअर्स महाराष्ट्रामध्ये जोडण्याचा संकल्प असून, त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना युवा वॉरिअर्स म्हणून जोडावे.

भाजप युवा मोर्चाच्या शहर व ग्रामीण विभागाची बैठक पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना एकही वीज कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा घरी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेला नव्हता. परंतु, आजची परिस्थिती उलट आहे. वीजपुरवठा खंडित करण्यासाठी शेतकऱ्यांना टार्गेट केले जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केला.

Chandrashekhar Bavankule
शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महावितरणचा एक ही कर्मचारी शेतकऱ्याची वीज कापण्यासाठी गेला नाही. तसेच, एक मिनीट सुद्धा भारनियमन झाले नाही. परंतु, आज राज्याला वीज टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून आगामी काळात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करत शहरातील सर्व प्रभागात युवा वॉरिअर्स व युवा मोर्चाच्या शाखा उघडणार असल्याचे सांगितले. ग्रामीणचे अध्यक्ष सचिन दराडे यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील बच्छाव, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी योगेश मैंद, भैरवी वाघ, विजय बनछोडे, सचिन हांडगे, सुमीत नहार, निखिलेश गांगुर्डे, प्रशांत घोडके, साक्षी दिंडोरकर आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.