BJP News: शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघावर दावा करणार नाही.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे जिल्ह्याचा दौरा केला.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSarkarnama

धुळे : भाजपच्या (BJP) संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर दौरा करत आहे. आगामी लोकसभा (Loksabha Elections) निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) (Eknath Shinde) आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त खासदार, तर राज्यात विधानसभेसाठी २०० जागा निवडून आणण्याचा संकल्प आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला. (Bjp state president claim 45 loksabha seats in Maharashtra)

Chandrashekhar Bavankule
NCP News: बावनकुळे यांनी आधी आपली राजकीय उंची तपासावी!

येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांनी खरमरीत टिका केला.

श्री. बावनकुळे म्हणाले, की नेते देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी आदिवासींचा विकास निधी पूर्णपणे खर्च कसा होईल याकडे लक्ष दिले. अनेक सरकारांनी आदिवासींच्या विकासासाठी निधी दिला. मात्र, ३१ मार्चपर्यंत तो खर्चच करायचा नाही. नंतर इतर कामांसाठी निधी वळवून घ्यायचा, अशी आधीच्या सरकारांची पद्धत होती. आदिवासींच्या निधीवर डाका टाकण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने केल्याचा आरोप श्री. बावनकुळे यांनी केला.

Chandrashekhar Bavankule
BJP News: बावनकुळेंची जीभ घसरली, सत्ता गेल्यापासून ‘ते’ बावचळलेत..!

ठाकरे गप्प का?

ते म्हणाले, मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाची घटना राज्यात घडली. ती लाजीरवाणी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यंमत्री आणि गृहमंत्र्यांना हा प्रकार घडत असल्याचे समजले नसेल?, केवळ मुख्यमंत्रीपद टिकण्यासाठी उद्धव ठाकरे शांत बसले होते का, असा प्रश्‍न आहे. सत्ता गमावून बसलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आता अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे कुठलेही कारण नसताना शिंदे- फडणवीस सरकारबाबत गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे.

शिंदे गटाबाबत भूमिका

भाजपकडून शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघावर कोणताही दावा सांगितला जाणार नाही. उलटपक्षी आम्ही त्यांचे आमदार व खासदार निवडून आणण्यासाठी ताकदीनिशी मैदानात उतरू. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) युती राहिल. त्यात तीळमात्र शंका नाही. भाजपच्या कार्यप्रणालीनुसार कार्यासाठी कोणी पुढे येत असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रवेश देऊ. चांगली वागणूक देऊ. धुळे जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत असल्याने समाधान आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज आहेत, या केवळ वावड्या असल्याचा दावा श्री. बावनकुळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका

टिका करताना ते म्हणाले, दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात नाराजी नाट्याचा जो प्रकार घडला, तो नवीन नाही. राष्ट्रवादीमधील धुसफूस वेळोवेळी समोर येत असते. या पक्षातील काही नेते, पदाधिकारी नाराज आहेत. त्यातील कुणी भाजपमध्ये आलेच तर स्वागत असेल. राष्ट्रवादी पक्ष केवळ तुष्टीकरणाच्या आधारावर टिकून आहे. या पक्षाकडे व्हीजन नाही. हा पक्ष नेत्याने बनविलेली टोळी आहे. टोळीतून हा पक्ष तयार झाला आहे. ज्या ठिकाणी नेता आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादी आहे. यामुळे नेता गेला की राष्ट्रवादी गेली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in