Nashik BJP News: भाजप कार्यकारिणीत नाशिकला ठेंगा!

Chandrashekhar Bawankule: भाजपच्या राज्य कार्यकारीणीत बव्हंशी जाणत्या पदाधिकाऱ्यांनी स्थान मिळालेले नाही.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Nashik News: भाजपकडून बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ९०० पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमध्ये प्रदेश सरचिटणीस उपाध्यक्ष व चिटणीस या महत्त्वाच्या पदांवर नाशिकमधून एकाही पदाधिकाऱ्यांची निवड झाली नाही. मात्र कार्यकारिणी सदस्यांमध्ये ४१ जणांना स्थान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. (BJP state president declaired new office bearers)

भाजपचे (BJP) मावळते प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यकारीणीत नाशिकच्या (Nashik) विविध पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. नव्या प्रदेशाध्यक्षांनी (Chandrakant Bavankule) नाशिकच्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे नव्या कार्यकारीणीत नाशिकवर अन्याय झाल्याची भावना आहे.

Chandrashekhar Bawankule
Yeola Bazar Samiti : छगन भुजबळांची विधानसभेची रंगीत तालमी यशस्वी!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ९०० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये सोळा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली.

या संपूर्ण यादीमध्ये नाशिकला मात्र महत्त्वाची पदे दिली गेली नाही. कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण सावजी, शंकर वाघ, अशोक व्यवहारे, दादाजी जाधव, तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बाळासाहेब सानप, विठ्ठल चाटे, अमृता पवार, तनुजा घोलप यांना संधी देण्यात आली आहे.

Chandrashekhar Bawankule
ZP corruption : शासनाला कोट्यावधींचा चुना, लेखापरिक्षणात राजरोस टक्केवारी!

हे आहेत निमंत्रित सदस्य

माजी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ. निशिगंधा मोगल, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदीप पेशकार, विजय साने, अजिंक्य साने, अलका अहिरे, मनीषा पवार, डॉ. प्रशांत पाटील, आशिष नहार, एन. डी. गावित, दादाराव जाधव, सोपान दरेकर, बिंदूशेठ शर्मा, मनोज दिवटे, योगेश माईंद, माधुरी पठार पालवे, महेश श्रीश्रीमान, स्मिता मुठे, शंकर वाघ, महेश मुळे, रोहिणी वानखेडे, रवींद्र अमृतकर, सुनील वाघ, डॉ. संध्याताई तोडकर, गोविंद बोरसे, नितीन पोफळे, बापूसाहेब पाटील, अनिकेत पाटील, सतीश मोरे, सुरेश निकम, प्रवीण अलई, डॉ. वैभव महाले, तुषार भोसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com