भाजप-शिवसेनेत राजकारण टोकाला, हा कचरा आहे की सोने!

धुळ्यामध्ये भाजप-शिवसेनेत पेटले कचऱ्याचे राजकारण सुरु आहे. त्यावर आंदोलन सुरु असल्याने वाद शिगेला पोहोचला आहे.
Dhule NMC meeting
Dhule NMC meetingSarkarnama

धुळे : शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेना गेले आठ दिवस टोकाला जाऊन आंदोलन करीत आहे. (Shivsena`s agitation on garbage issue of city) त्यावर टिका करणाऱ्या सत्ताधारी भाजपने स्थायी समितीच्या बैठकीत घुमजाव करीत (BJP also have change the role and support them) शिवसेनेच्या सुरात सुर मिसळला. या दोन्ही पक्षांत कचऱ्याच्या प्रश्नावर पेटलेले राजकारण पाहता, हा कचरा आहे की सोने? (Is it garbage or gold) असा प्रश्न नागरिकांत निर्माण झाला आहे.

Dhule NMC meeting
छगन भुजबळ म्हणतात, `मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती`

सत्ताधारी व विरोधकांत ही आदळ आपट सुरु होती. त्यातच प्रशासनाकडून मात्र वॉटरग्रेस कंपनीला अभय देत बिलही अदा केले. या सर्व गोंधळात कचरा संकलनाचे काम तूर्त तरी वॉटरग्रेस कंपनीकडूनच सुरू राहील असे अधोरेखित झाले, त्यासाठी कंपनीचे एक महिन्याचे बिलही अदा करण्याची कार्यवाही झाली आहे. सणासुदीचे दिवस असल्याचे कारणही त्यासाठी पुढे केले गेले. दरम्यान, कामात सुधारणा करू, नवीन कंत्राटदाराला काम देण्याबाबत शासनाची स्थगिती उठविण्यासाठी पुन्हा मंत्रालयात जाऊ, असे आयुक्त टेकाळे म्हणाले.

Dhule NMC meeting
राष्ट्रवादी काँग्रेस महापौरांच्या घरापुढे खोदणार खड्डे!

शहरातील कचरा संकलनप्रश्‍नी मागील महापालिका सभेत स्थायी समितीने वादग्रस्त वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या संस्थेचे काम बंद करून पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाचे स्वागतही झाले. मात्र, स्थायी समितीचा हा निर्णय या वेळीदेखील फुसका बार निघाला. कचरा संकलनप्रश्‍नी विरोधी सदस्य गंभीर स्थिती मांडत असताना सत्ताधाऱ्यांकडून आदळआपट केली गेली. स्वतः भूमिका मांडताना मात्र गंभीर स्थितीसह वॉटरग्रेसचे वाभाडे काढले. त्यामुळे या प्रश्‍नावर सत्ताधारी भाजप गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले.

महापालिकेत स्थायी समितीची ऑनलाइन सभा गुरुवारी सकाळी अकराला झाली. सभापती संजय जाधव, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य (ऑनलाइन, ऑफलाइन) उपस्थित होते. नेहमीप्रमाणे कचरा संकलनाचा प्रश्‍न सभेत उपस्थित झाला. समाजवादी पक्षाचे सदस्य अमीन पटेल यांनी कचऱ्याप्रश्‍नी काहीही मार्ग न निघाल्याने सभागृहात ठिय्या मांडत निषेध नोंदविला. श्री. पटेल यांच्या या कृतीला सत्ताधारी भाजपचे सदस्य सुनील बैसाणे, शीतल नवले यांनी विरोध दर्शवत ही स्टंटबाजी, नौटंकी असल्याचा आरोप केला. खुद्द सभापती जाधव यांचेही सूर बदललेले पाहायला मिळाले. त्यांनी या प्रश्‍नावर कधी आयुक्त, आरोग्याधिकाऱ्यांसमोर अशी आंदोलने केली का, असा उलट प्रश्‍न श्री. पटेल यांना केला.

सत्ताधाऱ्यांची आदळआपट

श्री. पटेल बोलत असताना सत्ताधारी भाजपचे सदस्य बैसाणे, नवले यांनी श्री. पटेल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तुमच्यात हिंमत असेल तर शहर आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून दाखवा, आमदारांचा निषेध करा, असे आव्हान श्री. बैसाणे यांनी श्री. पटेल यांना दिले, तर कचरा ठेक्याची वर्कऑर्डर कोणत्या नियमाखाली द्यायला सांगता, असा प्रश्‍न श्री. नवले यांनी केला. स्थगिती उठविण्यासाठी सर्व नगरसेवक मंत्रालयात आंदोलन करतील, असे सदस्य नागसेन बोरसे म्हणाले. श्री. पटेल यांनी स्टंटबाजीचे आरोप चुकीचे असून, मी नाटक करत असेन तर मला निलंबित करा, असे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. श्री. पटेल यांना विरोध करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीच नंतर वॉटरग्रेस व अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. त्यामुळे नेमका गोंधळ काय याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com