भाजप-शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचे आव्हान; मग कार्यकर्त्यांचे काय होणार?

Nashik Election| BJP| Shivsena| नाशिकमध्ये महापालिका निवडणूका होणार आहे.
BJP| Shivsena
BJP| Shivsena

नाशिक : राज्यात महापालिका निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. नाशिकमध्येही (Nashik) महापालिका निवडणूका (Municipal Election) होणार आहे. निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर नाशिक महापालिकेत मात्र सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी पक्ष शिवसेनेला (Shivsena) अंतर्गत बंडखोरांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेतील भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर निवडणूक लांबल्याची बातमी समोर आली. त्यानंतर काही जणांची धावपळ थांबली असली, तरी पुन्हा त्यांचे मन कधी बदलेल याची हे सांगता येत नाही. तर दूसरीकडे शिनवसेनेतही अशीच परिस्थिती आहे. माजी महापौर विनायक पांडे आणि अजय बोरस्ते यांचा वाद नाशिकमध्ये सर्वश्रुत आहे. तर सध्या शिवसेनाही राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे सध्या जरी कोणी जाहीररित्या पक्षविरोधी भूमिका घेत नसले तरी पक्षांतर्गत बंडाळ्या सुरुच असल्याचेही सांगण्यात येत आहे.

BJP| Shivsena
गृहखाते आक्रमक! दरेकरांना नोटीस; मुंबई पोलिसांनी उचलले पाऊल

आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत तिकीट वाटपात ही अंतर्गत बंडाळी समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भाजपच्या नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे या महापालिका निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. त्यांचे दीर योगेश हे नगरसेवक होते.

आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांना तिकीट हवे आहे. प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांची मुलगी पूर्वा सावजी, महापौर सतीश कुलकर्णी यांचे चिरंजीव वैभव आणि मुलगा संध्या निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांचा मुलगा अनिकेत, माजी आमदार सानप यांचा मुलगा मच्छिंद आणि सून, तसेच, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली यांनाही तिकीट हवे आहे. त्यामुळे यावेळी खरी धुसफूस आणि असंतोष पाहायला मिळणार आहे.

तर शिवसेनेतही हीच परिस्थिती आहे. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा, मुलगा दीपक आणि स्वतः बडगुजर हे निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचा पुतण्या आदित्य, ज्येष्ठ पदाधिकारी विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज, पुतणी शिवानी, ज्येष्ठ नगरसेविका कल्पना चुंभळे, त्यांचा मुलगा प्रताप, दीर कैलास या तिघांनाही महापालिकेच्या निवडणूकीसाठी इच्छूक आहेत. हे पाहता त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढणार हे नक्की.

दिग्गजांच्या मतभेदांमुळे कार्यकर्त्यांच्या पदरात काय पडणार, असा सवालही कार्यकर्ते करत आहेत. पक्षातील उमेदवारांना तिकीटे दिली तर घराणे शाहीचा शिक्का बसणार आणि जर कार्यकर्त्यांना तिकीटे पक्षातील हे ज्येष्ठ मदत करतीलच, याची खात्री नाही. त्यामुळे आगामी निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेपुढे ही अंतर्गत बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in