`सिडको` विरोधात कट्टर विरोधक आमदार हिरे आणि बडगुजर एकत्र!

सिडकोच्या मुख्य प्रशासक दीप मुधोळ- मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदन दिले.
Sudhakar Badgujar & Seema Hire
Sudhakar Badgujar & Seema HireSarkarnama

नाशिक : गेले काही दिवस चर्चा व राजकारणाचा विषय ठरलेल्या सिडको (CIDCO) कार्यालयाच्या स्थलांतराच्या प्रश्नावर आता सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सिडको भागात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना(Shivsena) -भाजप (BJP) देखील काल या प्रश्नावर एकत्र आली. आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी आंदोलनात भाग घेतला. (All party agitation on cidco issue in Nashik)

Sudhakar Badgujar & Seema Hire
तरुणीच्या दुचाकीत सापडला चक्क गावठी कट्टा!

सिडको कार्यालयाचे स्थलांतर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच कार्यालयात चारच कर्मचारी असल्याने मिळकत धारकांची विविध परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. याबाबत कार्यालयाचे स्थलांतर थांबवून प्रशासक कायम ठेवा, यासह व विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको मुख्य प्रशासक दीपा मुधोळ- मुंडे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी घेराव घातला. या वेळी शासनाच्या चुकीच्या निर्णय विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Sudhakar Badgujar & Seema Hire
पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार

मुख्य प्रशासक येथे येणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी सिडको कार्यालय गाठले. आधी सिडको फ्री होल्ड करा आणि कार्यालय कुठेही घेऊन जा, हा मुद्दा सिडकोवासीयांनी लावून धरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सिडको कार्यालयासमोरच मुख्य प्रशासक दीपा मुधोळ- मुंढे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

या वेळी मुख्य प्रशासक दीपा मुधोळ- मुंडे यांनी सिडकोवासीयांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला. कार्यालय बंद होणार नसून सुरूच राहणार आहे. कोणतेही कागदपत्र घेण्यासाठी नाशिक सोडून इतरत्र जावे लागणार नाही. सिडको फ्री होल्ड संदर्भात प्रपोजल मांडलेले असून, हा प्रश्‍नदेखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजप आमदार सीमा हिरे, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, माकपचे तानाजी जयभावे, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे यांसह मामा ठाकरे, संजय भामरे, बाळासाहेब गीते, देवेंद्र पाटील, संतोष सोणपसारे, प्रशांत जाधव, कैलास चुंभळे, अमर वझरे, अविनाश पाटील, मकरंद सोमवंशी, संतोष भुजबळ, रमेश उघडे, राहुल सोनवणे उपस्थित होते.

सिडकोवासीयांची कामे मार्गी लागायलाच हवी. मोठी लोकसंख्या असल्या कारणास्तव दोन-चार कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज होऊ शकणार नसून, पूर्णवेळ प्रशासक आवश्‍यक आहे.

- सीमा हिरे, आमदार

सिडको प्रशासकांची बदली करणे हे निषेधार्थ असून, प्रशासक पदाचे एखादे अधिकारी येथे कार्यरत असावे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ हजार सदनिका फ्री होल्ड करण्याबाबत घोषणा केली होती. आज ते सरकारमध्ये असून, त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा. मागणी मंजूर होईपर्यंत प्रशासक होऊ नये.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in