भाजप-आमदार शाह वाद; देवपूरसाठी ३० कोटी मिळालेच!

खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणतात, आम्ही पळवापळवीचा आमदार शाह यांचा प्रयत्न उधळला
Dr. Subhash Bhamre
Dr. Subhash BhamreSarkarnama

धुळे : देवपूरमधील (Dhule) रस्तेदुरुस्तीसाठी ३० कोटींचा निधी मिळविण्यात खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांना यश आले. त्यांनी हा निधी अन्यत्र वळविण्याचा एमआयएमच्या (AIMIM) आमदारांचा (Faruk Shah) प्रयत्न हाणून पाडला. भरीव निधी मिळाल्याने नागरिकांच्या रस्तेविषयक समस्या निकाली निघतील, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले. निधी उपलब्धतेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे आभार मानले. (BJP get 30 cr. Fund for Devpur area roads)

Dr. Subhash Bhamre
नितीन गडकरींची घोषणा हवेतच विरली...बऱ्हाणपूर महामार्ग नाहीच!

शासनाकडून नगरोत्थान योजनेंतर्गत देवपूरमधील ३८ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींचा निधी खर्च होईल. देवपूरमध्ये भुयारी गटार योजनेतील खोदकामामुळे रस्त्यांची वाताहत झाली. ते दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नाही. नंतर सत्तापरिवर्तन झाले आणि ३० कोटींचा निधी पदरात पडला असून, त्यात नऊ कोटी महापालिका व २१ कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे.

Dr. Subhash Bhamre
राज्याचे मंत्री गिरीश महाजनांना सुटेना दूध संघाच्या सत्तेचा मोह

तीस कोटींचा निधी शासकीय निर्देशाचे उल्लंघन करत अन्यत्र वळवून आमदारांकडून देवपूरवर अन्याय केला जात असल्याचे महापौर प्रदीप कर्पे आणि भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी खासदारांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे शासनाने स्थगिती मिळवून दिली. नंतर आता ३० कोटी निधी खर्चाला मान्यता दिली.

देवपूरमधील मंजूर रस्ते

धुळे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी हा निधी खर्च करण्यात येईल. यामध्ये वलवाडी शिवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तिरूपतीनगर, जिभाऊनगर व समर्थनगर परिसरात डांबरीकरण, वलवाडीत आश्विन ट्रेडर्स ते केशरनगरपर्यंत (झेंडा चौक) डांबरीकरण, कृष्ण मंदिर से दौलत बंगल्यापर्यंत काँक्रिट व गटार, मारुती मंदिर ते काशीनाथ बागूल यांच्या घरापर्यंत काँक्रिट व गटार, राजनगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, डॉ. पाठक ते सुरते मंगल कार्यालयापर्यंत डांबरीकरण, नवतेज कॉम्प्लेक्स ते वृंदावन कॉलनीपर्यंत डांबरीकरण, ग. द. माळी सोसायटी ते जिल्हा परिषद कॉलनीपर्यंत डांबरीकरण, कल्याणी बंगला ते कृषी कॉलनी व मुंबई आग्रा हायवे ते राजनगरपर्यंत डांबरीकरण, एकतानगरमधील नीलेश चक्की ते एकतानगर अंतर्गत डांबरीकरण आदी रस्त्यांचा समावेष आहे.

टक्केवारीचे आरोप रंगले

आमदार फारूक शाह यांनी राज्य शासमाकडे पाठपुरावा करून तीस कोटींचा निधी मंजुर करून घेतला होता. शहराच्या विकासासाठी हा निधी आणल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांनी हा निधी आपल्या नगरसेवकांच्या प्रभागातील रस्त्यांवर खर्च करण्याचे ठरवले होते. यावरून सत्ताधारी भाजप आणि `एमआयएम`चे आमदार फारूक शहा यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. त्यातून निधीमध्ये टक्केवारी घेतली जाते असा आरोप देखील करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com