भारत जोडोमुळे सत्ताधारी भाजपला धडकी भरली आहे

भारत जोडो यात्रेच्या समर्थनासाठी नवापूरला काँग्रेसतर्फे आमदार शिरीषकुमार नाईकांसह पदाधिकाऱ्यांची बाइक रॅली
Congress Rally in Navapur
Congress Rally in NavapurSarkarnama

नवापूर : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) समर्थन करण्यासाठी बुधवारी नवापूर (Nandurbar) शहरातून काँग्रेसतर्फे (Congress) बाइक रॅली काढण्यात आली. आमदार शिरीषकुमार नाईक (Shirishkumar Naik) यांनी बुलेट चालवून रॅलीचे संचालन केले. (Congress workers perform a bike rally in navapur)

Congress Rally in Navapur
काँग्रेसने केले राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे वस्त्रहरण!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नफरत छोडो, भारत जोडो यात्रेमुळे कन्याकुमारी ते काश्मीर असे सबंध देशभर बंधुभाव व सामाजिक एकतेचा संदेश समाजात गेला आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पसरवत असलेला द्वेष व भेदभावाची भावना संपुष्टात येईल. हा संदेश व भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या नेतृत्वाच्या उरात धडकी भरली आहे, असे काँग्रेसचे नेते आमदार शिरीषकुमार नाईक यांनी यावेळी सांगितले.

Congress Rally in Navapur
जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई सरकारवरच उलटली!

युवक काँग्रेसतर्फे रॅलीचा प्रारंभ शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते झाला. आमदार श्री नाईक यांनी स्वतः बुलेटवर स्वार होऊन रॅलीचे संचलन केले. रॅली साईमंदिरामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून लाइट बाजार, महात्मा गांधी पुतळ्याला हार अर्पण करून शीतल सोसायटी, शिवाजी रोड, राममंदीर गल्ली, सरदार चौक, बसस्थानक परिसरातून जाऊन महाविद्यालयात समारोप झाला. रॅलीत ‘नफरत छोडो, भारत जोडो’, ‘मिले कदम, जुडे वतन’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, पंचायत समिती सभापती बबिता गावित, नगराध्यक्षा हेमलता पाटील, तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित, डॉ. नचिकेत नाईक, शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया, पालिका गटनेता आशिष मावची, नगरसेवक आरिफभाई बलेसरिया, हारून खाटीक, नगरसेनिका बबिता वसावे, मंगला सैन, माजी उपनगराध्यक्ष फारूक शहा, माजी नगरसेवक अजय पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in