शिवसेनेचे महानगरप्रमुख कचऱ्याचे कंत्राटदार ‘वॉटरग्रेस’चे भागीदार

कचरा, खड्ड्यांच्या प्रश्नावरून धुळे महापालिकेत भाजप- शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे.
Bjp Mayor pradeep Karpe
Bjp Mayor pradeep KarpeSarkarnama

धुळे : शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न Garbage collection issue serious in city) आणि देवपूरसह ठिकठिकाणच्या खड्ड्यांप्रश्‍नी शिवसेनेने महापालिकेतील सत्ताधारी भाजपला आंदोलने निवेदनांच्या माध्यमातून घेरले आहे. (Shivsena warns agitaion on the issue) या प्रकरणी भाजपचे नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांनी पलटवार करत कचरा संकलनातील ठेकेदार वॉटरग्रेस कंपनीत शिवसेनेचा महानगरप्रमुख (Shivsena city leader partner in garbage contractor watergrace compony) भागीदार असल्याचा व संबंधितांच्या बँक खात्यात पैसे वळते झाल्याचा खळबळजनक आरोप केला.

Bjp Mayor pradeep Karpe
`ईडी`ची कारवाई विसरून राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी!

शहरात भुयारी गटार योजनेसह त्यासाठी नियुक्त ठेकेदारावर पूर्णतः जीवन प्राधिकरणाचे नियंत्रण आहे. ही यंत्रणा महाविकास आघाडी शासनाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे देवपूरमधील नादुरूस्त रस्ते व खड्ड्यांना आघाडी शासनच जबाबदार आहे. या स्थितीत शिवसेनेकडून होणारी आंदोलने केवळ भाजपसह महापालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. यापेक्षा शिवसेनेने आघाडी शासनाकडून निधी मिळवावा आणि हे प्रश्‍न सोडवावे, असे आव्हान महापौर कर्पे यांनी पत्रकार परिषदेतून दिले. उपमहापौर भगवान गवळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गवळी, गटनेते राजेश पवार, चेतन मंडोरे व काही नगरसेवक उपस्थित होते.

Bjp Mayor pradeep Karpe
मिनी मंत्रालयाचे निकाल अन् नाशिकचे भवितव्य ठरवणार!

आर्थिक हितसंबंधामुळे दिशाभूल

महापालिका आपली जबाबदारी नाकारत नाही. अतिवृष्टीमुळे खड्ड्यांची दुरुस्ती करता आली नाही. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यात मजिप्राने भुयारी गटार योजनेचे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला किती दंड केला? शासनाच्या मदतीने ठेकेदाराकडून खड्डे दुरुस्ती का करून घेण्यात आली नाही? यात शासन किंवा मजिप्राचे काही आर्थिक हित आहे का? असे हित लपविण्यासाठी शिवसेना वारंवार धुळेकरांची दिशाभूल करीत आहे, असा गंभीर आरोपही महापौरांनी केला. नंतर मजिप्रा, भुयारी गटार योजनेचा ठेकेदार नित्कृष्ट काम करत असल्याच्या वारंवार तक्रारी आणि मजिप्रा शासनाच्या नियंत्रणात असतानाही त्याविरोधात भाजपने का आंदोलन केले नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर भाजप, मनपा सत्ताधारी आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही महापौर कर्पे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची गुळमुळीत भूमिका

कचरा संकलनात गैरप्रकार करणाऱ्या अकार्यक्षम ठेकेदार वॉटरग्रेस कंपनीविरोधात असंख्य तक्रारी झाल्या. या कंपनीची निविदा रद्द करून मनपाने नवीन ठेकेदार नियुक्तीचा निर्णय घेतल्यावर कार्यादेश का दिला जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर एमआयएमचे आमदार फारुक शाह यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी नवीन ठेकेदार नियुक्तीला आघाडी शासनस्तरावर स्थगिती मिळविली आहे, असे महापौरांनी सांगितले. शासनाच्या या कार्यवाहीविरोधात शिवसेनेने का आंदोलन केले नाही, असा प्रतिप्रश्‍न‍ महापौरांनी केला. यात शिवसेनेचे महानगरप्रमुख वॉटरग्रेस कंपनीत भागीदार होते, त्यापैकी कुणाच्या बँक खात्यात किती ठेक्याचे पैसे वळते झाले हेही वेळप्रसंगी सिद्ध करू, असे महापौर कर्पे यांनी सांगितले.

आंदोलनापेक्षा शासनाकडे जा...

महाविकास आघाडी शासनात शिवसेनाही आहे. त्यामुळे या पक्षाने आंदोलन करण्यापेक्षा शासनाकडे जावे, शहरातील प्रश्‍न मांडून सोडवणूक करावी, त्यासाठी आम्ही (भाजप) सोबत असू, असे सांगत महापौरांनी कचऱ्याप्रश्‍नी नवीन ठेकेदार नियुक्तीवरील स्थगित उठवावी, यासाठी भाजपचे पदाधिकारी नगरविकासमंत्र्यांकडे गेले होते. मात्र स्थगिती देणारे तेच आणि आंदोलन करणारेही तेच, अशी शिवसेनेची दुहेरी नीती असल्याचे विशद केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com