आदिवासी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेसला धक्का; भाजपने केली 25 वर्षांची सत्ता खालसा

Adivasi Cooperative Sugar Factory : येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मोठा फेरबल झाला आहे.
Adivasi Cooperative Sugar Factory Election
Adivasi Cooperative Sugar Factory ElectionSarkarnama

Adivasi Cooperative Sugar Factory : येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मोठा फेरबल झाला आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता त्याचा निकाल हाती आला आहे. (Adivasi Cooperative Sugar Factory Election)

साखर कारखान्यात २५ वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले आहे. संस्थापक, माजी मंत्री व काँग्रेस (Congress) नेते सुरूपसिंग नाईक (Surup Singh Naik) यांची सत्ता खालसा झाली आहे. गेल्या चार निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. यंदा पहिल्यांदाच निवडणूक झाली. भाजपच्या (BJP) भरत गावित आणि विजयकुमार गावित यांचा पॅनेलची सत्ता आली आहे.

Adivasi Cooperative Sugar Factory Election
नीलम गोऱ्हेंना पाहताच रुग्णालायत उपचार घेत असलेल्या बापटांनी विचारला प्रश्न; म्हणाले...

दरम्यान, शेतकरी विकास व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यामध्ये २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण चोवीस मतदान केंद्रावर ५३.९६ टक्के मतदान झाले होते.

Adivasi Cooperative Sugar Factory Election
Eknath Shinde News : AU विरुद्ध ES राजकारण तापले : शिंदेंचे, राऊतांना प्रत्युत्तर; प्रकरण काय?

मतदान कामासाठी १८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहायक निबंधक अधिकारी भारती ठाकूर, सहायक निवडणूक अधिकारी नीरज चौधरी, क्षेत्रीय अधिकारी सचिन खैरनार, शीतल महाले, शरद चौधरी आदी लक्ष ठेऊन होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com