उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा लोडशेडींगमुळे आवाज बंद!

मनमाड येथे पत्रकार परिषदेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपवर टीका केली.
उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा लोडशेडींगमुळे आवाज बंद!
Prajakt TanpureSarkarnama

मनमाड : एका खासगी कार्यक्रमाला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) शहरात आले होते. त्यांचे भाषण सुरु ऊर्जा मंत्र्यांनाही खंडित विजेचा सामना करावा लागला. कार्यक्रम सुरू असतानाच वीज गेल्याने (Power cut) अंधार झाला. मात्र काही वेळातच वीजपुरवठा पूर्ववत झाला. शहरात (Manmad) रोज होणारे भारनियमन ऊर्जा राज्यमंत्री आल्याने झाले नाही.त्यामुळे असे दौरे रोज झाले तर भारनियमन होणार नाही, अशी चर्चा सुरू होती.

Prajakt Tanpure
गडकरी साहेब, टोल नाक्यांचा गुंता सोडवा, जनतेचे पैसे वाचवा!

भाजपने (BJP) गेल्या पाच वर्षात विजेच्या क्षेत्रात (Power sector) कुठलेही भरीव कार्य केले नसल्यानेच आज महाराष्ट्रात (Maharashtra) भारनियमनाची परिस्थिती उद्‌भवली आहे, अशी टीका ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Prajakt Tanpure
दीपक पांडेचे उपक्रम नाशिकमध्ये पुढे सुरु राहणार!

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे गुरुवारी (ता. २१) मनमाड येथे खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी येथील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या रामकुंज बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात सुरू असलेल्या भारनियमनावर त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. कोळशाचा पुरवठा केंद्रातून होत नसल्याने वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजपने भरनियमनावर बोलण्यापेक्षा केंद्रातून कोळसा कसा उपलब्ध होईल, हे पहावे.

भाजपच्या काळात महानिर्मितीमध्ये एक तरी नवीन वीज निर्मिती प्रकल्प आणला आहे का, असा सवाल उपस्थित करत ज्यांची बिले थकीत आहे, त्यांच्यासाठी नवीन योजना आणली असून, त्यात व्याज दंड माफ केले जाणार आहे. शेतकरी व सामान्यांना वीजबिल भरण्यास विनंती करा, काही टप्प्यात बिले भरून घ्या, लगेच वीज कनेक्शन तोडू नका, महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दोन- तीन दिवसात अनधिकृत वीज कनेक्शन शोधून कारवाई करावी, असे निर्देश दिले.

वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर बडगा उगारला गेला पाहिजे, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम सुरू आहे. आघाडीच्या काळात आम्ही भारनियमनमुक्त राज्य केले होते. मात्र, भाजपच्या काळात कोणतेही काम झाले नाही. पेट्रोलचे दर कमी करायला सांगा, हे विषय भाजपला सुचत नाही. मात्र, विरोधी पक्षाचे काम करत असताना सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न ते विसरले असल्याची टीका तनपुरे यांनी केली.

या वेळी माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब शेख, शहराध्यक्ष दीपक गोगड, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, कार्याध्यक्ष नाना शिंदे, अक्षय देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.