भाजपला आत्महत्येची धमकी देणाऱ्या नागसेन बोरसेंची पाच मिनीटांत माघार!

धुळे महापालिकेच्या उपमहापौरपदी अनिल नागमोते यांची बिनविरोध निवड झाली.
Newly elected Dy Mayor & BJP corporators
Newly elected Dy Mayor & BJP corporatorsSarkarnama

धुळे : उपमहापौरपदाच्या (Dhule) उमेदवारीसाठी अडून भसलेले भाजपचे (BJP) नागसेन बोरसे यांनी विविध प्रकारे दबाव आणला होता. उमेदवारी न मिळाल्यास आत्महत्या करीन असा इशारा दिला होता. मात्र काल प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रीया सुरु झाल्यावर अवघ्या ५ मिनीटांत त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजपचे अनिल नागमोते (Anil Nagmote) यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

Newly elected Dy Mayor & BJP corporators
नगरसेवक झाले `माजी`, लेटरहेड, बोधचिन्ह वापरल्यास दाखल होईल गुन्हा?

उपमहापौरपदावरून रंगलेल्या नाराजीनाट्यावर मंगळवारी अखेर पडदा पडला. बंडखोरीच्या पवित्र्याने उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलेल्या नागसेन बोरसे यांनी अर्ज मागे घेतल्याने अनिल नागमोते यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

Newly elected Dy Mayor & BJP corporators
चित्राताई, फडणवीसांच्या कार्यकाळातच सर्वाधीक महिला अत्याचार!

उपमहापौरपदासाठी मंगळवारी महापालिका सभागृहातून विशेष ऑनलाइन सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार श्री. नागमोते, नाराज उमेदवार श्री. बोरसे यांच्यासह इतर काही सदस्य प्रत्यक्ष सभागृहात, तर काही सदस्य ऑनलाइन उपस्थित होते.

पीठासीन अधिकारी शर्मा यांनी उमेदवारी अर्जांची छाननी करून श्री. नागमोते व श्री. बोरसे यांचे अर्ज वैध ठरविले. त्यानंतर माघारीसाठी (११ः०८ ते ११ः२३) १५ मिनिटांचा अवधी जाहीर केला. त्यानंतर लगेचच श्री. बोरसे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. माघारीसाठी दिलेला १५ मिनिटांची अवधी संपल्यानंतर पीठासीन अधिकारी श्री. शर्मा यांनी श्री. नागमोते यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे घोषित केले.

भाजकडून जल्लोष

श्री. नागमोते यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजप कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समिती सभापती शीतल नवले, माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी श्री. नागमोते यांचा सत्कार केला. माजी उपमहापौर भगवान गवळी, सभागृह नेते राजेश पवार, महिला बालकल्याण समिती सभापती योगिता बागूल, उपसभापती आरती पवार, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, आदी उपस्थित होते.

विकासासाठी काम

उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर श्री. नागमोते यांनी पक्षाचे नेते आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे यांच्यासह सर्व नगरसेवकांचे आभार मानले. उपमहापौरपदाच्या कार्यकाळात जनतेच्या विकासासाठी काम करेन, जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे श्री. नागमोते म्हणाले.

बोरसेंचा विचार होईल

नागसेन बोरसे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पक्ष आदेश स्वीकारला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भविष्यात पक्ष त्यांचा निश्‍चितच विचार करेल व संधी देईल, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अग्रवाल म्हणाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com