शिवसेनावासी भाजप नगरसेवकांना दिलासा, सुनावणी टळली!

जळगाव महापालिकेतील नगरसेवक अपात्र सुनावणी ७ जूनपर्यंत लांबली.
Jalgaon Municiple corporation Building
Jalgaon Municiple corporation BuildingSarkarnama

जळगाव : महापालिका (Jalgaon) नगरसेवक (Corporators) अपात्र प्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, ती आता ७ जूनला होणार आहे. जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे (BJP) २७ नगरसेवक फुटले व त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा दिला होता.

Jalgaon Municiple corporation Building
मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!

भारतीय जनता पक्षाला दिलेला मतदानाचा व्हीप डावलल्याबद्दल या नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी याचिका भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे दाखल केली, तर फुटलेल्या गटानेही आम्हीच भाजपचे नगरसेवक आहोत, आमचा व्हीप डावलण्यात आला. त्यामुळे भाजपचे नगरसेवक अपात्र ठरवावेत, अशी याचिका भाजपचे ॲड. दिलीप पोकळे यांनी दाखल केली.

Jalgaon Municiple corporation Building
दीपिका चव्हाण यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याची ५१ मिनीटे शिवीगाळ!

त्यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी दोन्ही गटांना नोटीस बजावून नाशिक येथे सुनावणीसाठी बोलाविले होते. पुढील सुनावणी आता ७ जूनला होणार आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com