Uddhav Thackrey News; भाजपला झटका, अस्लम मणियार, मदन डेमसे शिवसेनेत

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करताना अस्लम मणियार, मदन डेमसे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी
Uddhav Thackrey with Shivsena leaders.
Uddhav Thackrey with Shivsena leaders.Sarkarnama

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या शिवसेनेने (Shivsena) आज भाजपच्या (BJP) प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन भाजपला झटका दिला. भाजप पदवीधर मतदारसंघाच्या नियोजनात व्यस्त असताना मुंबई येथे हा प्रवेश सोहळा घडवला. (Shivsena given political shock to Nashik BJP)

Uddhav Thackrey with Shivsena leaders.
Karad : सरपंचाचं लग्न ठरेना; मग काय, थेट केंद्रीय मंत्र्यांनाच घातले साकडे

प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डी गाव येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते मदन डेमसे, नाशिक रोडचे माजी नगरसेवक अस्लम मणियार, प्रशांत जाधव आणि योगेश भोर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यांनी सोमवारी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.

Uddhav Thackrey with Shivsena leaders.
Shiv Sena : खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर आज होणार फैसला

प्रभाग ३१ चे माजी नगरसेवक सुदाम डेमसे आणि संगीता जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मदन डेमसे यांचा ठाकरे गटातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. पाथर्डी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाकेराव डेमसे यांचे ते चिरंजीव आहेत. भाजपमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा ठाकरे गटातील संभाव्य प्रवेशदेखील आजच्या प्रवेशामुळे थांबल्याचे जवळपास नक्की झाले आहे.

पाथर्डी गावातील ठाकरे गटाची ताकद वाढण्यास पुन्हा बळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे देवळालीगाव येथील प्रशांत जाधव, शिवसेनेचे पुर्वीचे योगेश भोर यांनी प्रवेश केला. प्रवेश करताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीदेखील भेट घेतली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट आणि विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे यांच्यासह पाथर्डी गावातील असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, विलास शिंदे, केशव पोरजे, महिला आघाडीच्या शोभा मगर आदींसह नेते या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in