पंधरा मार्चपर्यंत मेट्रोचा नारळ फोडण्याची भाजपची तयारी?

शहरात भाजपकडून निओ मेट्रोच्या ऑनलाइन उद्‌घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
satish Kulkarni
satish KulkarniSarkarnama

नाशिक : केंद्रीय (Centre Government) अंदाजपत्रकात मेट्रो निओची घोषणा झाली. मात्र अद्यापही भाजपकडून (BJP) नारळ फुटलेले नाही. आता पाच वर्षाचा कारभार संपत आला आहे. प्रशासक नियुक्तीचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या (NMC) प्रचारात शिवसेनेच्या (Shivsena) हाती अपप्रचाराचे आयते कोलीत हाती लागण्याच्या शक्यतेने दोन भाजपची झोप उडाली आहे.

satish Kulkarni
ओबीसी समाजास राजकारणातून हद्दपार करण्याचा डाव!

आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेट्रो निओची सल व्यक्त झाल्यानंतर तातडीने पावले उचलत प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची तयारी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर साधारण १५ मार्चच्या आत प्रकल्पाचे उद्‌घाटन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने उद्‌घाटन होण्याची तयारी असली तरी राज्याचे सर्व नेते नाशिकमध्ये उद्‌घाटनासाठी आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

satish Kulkarni
धुळ्याचे ‘पीडब्ल्यूडी’ अधिकारी खुले आम मागतात पैसे?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राईटस कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. ऑगष्ट २०१९ मध्ये 'मेट्रो निओ' असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली.

या प्रकल्पासाठी २१००. ६ कोटी खर्च येणार असून राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये तर १,१६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. कोरोनामुळे मेट्रो निओ प्रकल्पाला फटका बसला. कोरोनाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत एजन्सी नियुक्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली असती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रो निओचा प्रकल्प आवडल्याने वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात प्रकल्प होण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. वाराणसी बरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोरखपूर विधानसभा मतदारसंघात प्रकल्प सुरू करायचा असल्याने त्यासाठी आता येत्या २५ जानेवारीपर्यंतचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक कारणाने लांबला.

आता मार्चचा दुसरा आठवडा

दोन आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते. त्या वेळी मेट्रो निओचा विषय छेडला. आमदार जयकुमार रावल यांनी चार ते पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे भाषणात म्हणाले, ती चुक सुधारताना फडणवीस यांनी अंदाजपत्रकात मंजुरी मिळाल्यानंतर दोनदा कॅबिनेटच्या मंजुरीला फाइल जाते, असे सांगितले. त्यानंतर प्रकल्प उद्‌घाटनासाठी हालचाली गतिमान झाल्या त्याचाच, एक भाग म्हणून आता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

मुदत वाढणार

नाशिक मेट्रोसाठी २०२३ ची डेडलाईन होती, परंतु अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी न मिळाल्याने काम सुरू झाले नाही. त्यामुळे आता मार्च महिन्यात उद्‌घाटन झाल्यास वर्षभर प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कडून पहिल्या कॉरिडॉर ३६ व दुसऱ्या कॉरिडॉरसाठी १४, असे एकूण पन्नास डब्याचे (कोच) डिझाईन, उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com