भाजपने सुविधा दिल्या नाही, मात्र चौपट करवाढ लादली!
NCP agitation at Dhule corporation.Sarkarnama

भाजपने सुविधा दिल्या नाही, मात्र चौपट करवाढ लादली!

धुळे येथे वाढीव कर आकारणीच्या नोटिशींची होळी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

धुळे : हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील (Dhule) मालमत्तांचे नव्याने मोजमाप करून या मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया महापालिकेने (Dhule Corporation) सुरू केली आहे. दरम्यान, हा सुधारित कर चार-पाच पटीने जास्त असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुधारित कर आकारणीच्या नोटिशींची मनपा प्रवेशद्वारात होळी करत निषेध केला. हा सुधारित कर रद्द करावा अशी मागणीही पक्षाने केली. (NCP agitate against tax increase by Dhule corporation)

NCP agitation at Dhule corporation.
भाजप आमदार सुरेश भोळे यांनी एक रस्ताही केला नाही!

महापालिकेने हद्दवाढ क्षेत्रातील वलवाडी, भोकर, बाळापूर, मोराणे, नकाणे, पिंपरी, चितोड, अवधान, महिंदळे, वरखेडी, नगाव (अंशतः) येथील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करून सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मनपा हद्दीतील आरसीसी घरांना तसेच माती, पत्र्याच्या घरांना कमीत कमी अडीच ते सात रुपये प्रति चौरस फूट प्रति वर्ष एवढी वाढीव घरपट्टी आकारली जाणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. कमीत कमी पुढील पाच वर्ष मालमत्ता कर वाढवू नये अशी जनतेची अपेक्षा आहे.

NCP agitation at Dhule corporation.
खडसेंच्या उमेदवारीने राष्ट्रवादी करणार गिरीश महाजनांची कोंडी?

मात्र, याकडे दुर्लक्ष करून मनपातील सत्ताधारी भाजप पदाधिकारी व प्रशासनाने पाच पटीने मालमत्ता कर वाढवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप पक्षाने केला. नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकेप्रमाणे धुळे महानगरपालिका कोणत्याही सोयीसुविधा नागरिकांना देत नाही. मात्र, या शहरांपेक्षा जास्त कर वसूल करते याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला.

वाढीव कर रद्द करा

महापालिकेने सुधारित वाढीव कराची प्रक्रिया त्वरित मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. दरम्यान, मालमत्ताधारकांनीही नवीन दराप्रमाणे कर भरू नये, नोटिसा न स्वीकारता हरकती घ्याव्यात. तसेच सर्व नगरसेवकांनी ठराव करून वाढीव कर रद्द करावा असे आवाहनही पक्षाने केले. मागणीचे निवेदन आयुक्त देविदास टेकाळे यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, तेजस गोटे, नवाब बेग मिर्जा, जोसेफ मलबारी, कैलास चौधरी, भोला वाघ, नगरसेवक वसीम मंत्री, जगन ताकटे, सरोज कदम, तरुणा पाटील, सुमीत पवार, महेंद्र शिरसाट, रईस काझी, सलीम लंबू, जमीर शेख, रजनीश निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in