भाजप खासदार रक्षा खडसे यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी ही भेट झाली.
BJP MP Raksha Khadse meets NCP MP Supriya Sule
BJP MP Raksha Khadse meets NCP MP Supriya SuleSarkarnama

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी ही भेट झाली. (Supriya Sule Latest Marathi News)

खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता.१७) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाई विरोधात त्यांनी आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी त्या जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताई मंदीरात जाऊन दर्शन घेतले. (BJP MP Raksha Khadse meets NCP MP Supriya Sule)

BJP MP Raksha Khadse meets NCP MP Supriya Sule
ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका; सर्वोच्च न्यायालायकडून मध्य प्रदेशला मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हा दूध संघांच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यावेळी उपस्थित होत्या. सुप्रिया सुले यांनी खडसेंच्या घरीही सदिच्छा भेट दिली. याबाबत त्यांनीच ट्विट करून माहिती दिली.

सुप्रिया सुळे यांनी भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रक्षा खडसे या सुप्रिया सुळेंचे पुष्पगुच्छ देतानाचाही फोटो आहे. या फोटोमध्ये मंदाकिनी खडसेही दिसत आहेत. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचे दोघींनीही स्पष्ट केलं आहे.

या भेटीविषयी बोलताना खडसे यांनी त्या आपल्या मतदारसंघात आल्याने सत्कार केल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, 'सुप्रिया सुळे या खासदार आहेत. दिल्लीत आमची भेट होत असते. आज त्या मतदारसंघात आल्या. त्यामुळे आपण त्यांचा सत्कार केला. याला कोणीही राजकारणातून पाहू नये.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com