‘कोणी कशा आणि कशासाठी भूमिका बदलल्या, हे जनतेला माहिती आहे’

भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती झाली तरी त्यामुळे राज्यातील राजकारणात काहीही फरक पडणार नाही.
Raj Thackeray-Chhagan Bhujbal
Raj Thackeray-Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : ‘‘कोण कशासाठी आपल्या भूमिका बदलतात, कशा बदलतात याची कल्पना राज्यातील जनतेला आहे, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा सूचक भाष्यही त्यांनी केले. (BJP-MNS alliance will not make any difference in state : Chhagan Bhujbal)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेची चर्चा अजूनही सुरू आहे. विशेषतः ठाकरे यांची बदलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या निवडणुकीत राज यांनी भाजपच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत आवाज उठवला होता. मात्र, मधल्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जवळ गेली तर मनसे ही भाजपच्या. भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून राज्यात रंगत आहे. तोच धागा पकडून भुजबळ यांनी ठाकरेंना टोला लगावला.

Raj Thackeray-Chhagan Bhujbal
अर्थमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी कायम राहीन : अजितदादांचा सी-६० जवानांच्या मेहनतीला सलाम!

ते म्हणाले की, राज्यात सुरु असलेल्या राजकीय खेळात सध्या अनेक जण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच भाजप आणि मनसेची युती होण्याच्या बातम्या वेग धरू लागल्या आहेत. भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती झाली तरी त्यामुळे राज्यातील राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray-Chhagan Bhujbal
वीजटंचाई : ‘त्यांना बाहेरून वीज घ्यायचीय’; दानवेंचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

कोण कशासाठी आपल्या भूमिका बदलतात, कशा बदलतात या साऱ्याची कल्पना राज्यातील जनतेला आहे, असा टोला मनसेला लगावून छगन भुजबळ यांनी ‘आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल,’ असे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com