भाजप आमदार संजय सावकारे म्हणाले, मला राष्ट्रवादीकडून ऑफर, पण...

भुसावळ येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय सावकारे (Sanjay Sawkare) यांनी हा दावा केला.
भाजप आमदार संजय सावकारे म्हणाले, मला राष्ट्रवादीकडून ऑफर, पण...
MLA Sanjay Sawkare

भुसावळ : मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) ऑफर येत आहे, पण मी भारतीय जनता पक्ष (BJP) सोडणार नाही. कारण देशाच्या सुरक्षेसाठी भाजप आवश्यक आहे, असे मत आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी व्यक्त केले. (Bhusawal Latest Marathi News)

MLA Sanjay Sawkare
राखी सावंतने नोटीस मिळताच मागितली माफी!

येथील सिंधी कॉलनीमधील प्रभाग २१ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सिंधी कॉलनीत रामभाऊ बेकरीपासून भक्त निवासपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविण्याचा प्रारंभ आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाला.

MLA Sanjay Sawkare
राणांवर कारवाई करता मग मिटकरींवर का नाही?

आमदार सावकारे म्हणाले, की प्रभाग २१ मध्ये खूप चांगली कामे झाली आहेत. काही कामे बाकी असून, तीही लवकरच पूर्ण करू. कोणत्याही परिस्थितीत प्रभागाला निधी कमी पडू देणार नाही. सिंधी कॉलनीतील नागरिकांनी मला खूप प्रेम दिले आहे आणि सिंधी समाज भाजपचा कायम मतदार असून, आज देशाच्या सुरक्षेसाठी भाजपच पाहिजे. मला राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ऑफर्स येत आहेत, पण मी आता भाजप सोडणार नाही.

ते पुढे म्हणाले, माजी नगरसेवक निक्की बतरा व अजय नागराणी बरीच कामे स्वखर्चाने करीत असून, येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा दोघांना निवडून द्यावे, असे आवाहन सावकारे यांनी केले.

माजी नगरसेवक निक्की बतरा व अजय नागराणी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष रमेश नागराणी, ज्ञानसेठ लेखवानी, सिरवाणी सर, त्रिलोक मनवानी, मनोहरसेठ सोढाई, राजकुमार वादवानी, सुनीलकुमार बसंतानी, मनोहरलाल तेजवणी, नारायनदास बठेजा व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.