भाजप खासदाराला पक्षाच्याच आमदार समर्थकांचे काळे झेंडे...

Heena Gavit रस्त्याच्या भूमिपूजनावरुन भाजप (BJP) खासदार आणि आमदारामध्ये श्रेयवाद रंगला आहे.
Heena Gavit, Rajesh Padvi
Heena Gavit, Rajesh Padvisarkarnama

तळोदा : रस्त्याच्या भूमिपूजनावरुन भाजप (BJP) खासदार आणि आमदारामध्ये श्रेयवाद रंगला आहे. या वादातून आमदाराने आपल्याच पक्षाच्या खासदारा विरोधात काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. नंदुरबारच्या खासदार हिना गावीत (Heena Gavit) आणि आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) यांच्यामध्ये श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. या वादातूनच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन एकाच दिवसी दोघांनीही केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सोमावल ते नर्मदानगर रस्त्यावरुन जिल्ह्यात राजकारण तापले आहे.

या रस्त्यामुळे भाजपमधीलच आमदार व खासदार आमने-सामने आले. हिना गावीत रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करत असताना आमदार राजेश पाडवी यांच्या समर्थकांनी महामार्गावर एकत्रित येऊन काळे झेंडे घेऊन निदर्शने केली. याबाबत पक्षाच्याच केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या निधीतील रस्त्याचे एकाच दिवसात दोनदा भूमिपूजन झाले. त्यामुळे या वादावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Heena Gavit, Rajesh Padvi
‘मला आता पुढच्या निवडणुकीत निवडून देऊ नका...’ : अजितदादा भरसभेत असे का म्हणाले?

दरम्यान, राजेश पाडवी यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेत गावीत यांच्यावर आरोप केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून मी आणलेल्या कामाचे श्रेय हिना गावीत घेतल असल्याचे त्यांनी म्हटले होते. मला डावलून कामाचे भूमिपूजन होउ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. सोमावल ते नर्मदानगर एकूण ६ किमीच्या या रस्त्यासाठी लागणारा निधी नंदुरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला, असल्याचेही पाडवी यांनी सांगितले.

Heena Gavit, Rajesh Padvi
IPL कडे 11 कोटींची थकबाकी : पवार, वळसे पाटील आणि संजय पांडेंची झाली बैठक

मात्र, गावित या निधीसाठी आपल्या प्रयत्नाने मिळवून दिला असे भासवून जनतेच्या डोळयात धूळफेक करीत आहेत. त्यांनी कार्यक्रमाला यावे. मात्र, आम्हाला विश्‍वासात घ्यावे. आम्हालाच नव्हे तर विकास कामासाठी इतर पक्षाच्याही लोकप्रतिनिधींना सहभागी करुन करावे. केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी गावित या कामाचे भुमिपूजन करण्याची घाई करत आहेत, असेही पाडवी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com