विरोधक नव्हे, भाजपचे आमदार म्हणतात, शेतकऱ्यांना ५० हजार भरपाई द्या!

आमदार अमरीशभाई पटेल तसेच काशिराम पावरा यांनी एकरी ५० हजार देण्याची मागणी केली.
Kanshiram Pawra & Amrishbhai Patel
Kanshiram Pawra & Amrishbhai PatelSarkarnama

शिरपूर : तालुक्यातील (Dhule) बोराडी व सांगवी मंडळात अतिवृष्टी (Heavy rainfall) आणि वादळामुळे झालेल्या पिकांच्या (Crop damages) नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना भरपाई (Relief for farmers) मिळवून द्यावी अशी मागणी आमदार अमरिशभाई पटेल, (Amrishbhai Patel) आमदार काशिराम पावरा (Kashinath Pawra) यांनी केली. (Both BJP MLA Deemands 50 K per acre relief in Dhule for heavy rainfall)

Kanshiram Pawra & Amrishbhai Patel
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

सात ऑक्टोबरला रात्री झालेले वादळ आणि अतिवृष्टीमुळे मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीनसह फळपिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक शेतांमधील माती वाहून गेल्याचे दिसून आले. आमदार काशिराम पावरा यांनी काही ठिकाणी भेट दिली असता शेतकऱ्यांनी झालेल्या हानीबाबत माहिती देताना शेती व्यवसाय पूर्णत: उद्‌ध्वस्त झाल्याचे सांगितले.

Kanshiram Pawra & Amrishbhai Patel
Shivsena: `आता याचा बदला लोकच घेतील`

बोराडी व सांगवी मंडळात सर्वाधिक नुकसान झाले असून, अन्य मंडळामध्येही पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करावेत व त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांनी केली.

किसान सभेचे निवेदन

महाराष्ट्र किसान सभेतर्फे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. हिरालाल परदेशी यांनी प्रशासनाला निवेदन दिले. सहा व सात ऑक्टोबरला झालेल्या हानीपोटी विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम देण्यात यावी, पीक विमा नसलेल्या शेतकऱ्‍यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्‍यांचे थकीत कर्ज, वीजबिल वसुलीसाठी सक्ती करु नये अशी मागणी निवेदनातून केली.

पाऊस सुरुच

सहा ऑक्टोबरपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी (ता.८) देखील सुरु होता. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत होता. दुपारी पावसाला सुरवात झाली. नियमित अंतराने दिवसभरात पावसाची रिपरिप सुरु होती. सात सप्टेंबरला शिरपूर मंडळात १८ मिमी, थाळनेर मंडळात ३९ मिमी, होळनांथे मंडळात १६ मिमी, अर्थे मंडळात १३ मिमी, जवखेडा मंडळात चार मिमी, बोराडी मंडळात २५ मिमी तर सांगवी मंडळात ३२ मिमी पाऊस झाला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com