भाजपच्या इतर आमदारांना मंत्रीपदाची प्रतिक्षा; पण इकडे मंगेश चव्हाणांना 'लॅाटरी!'

शिंदे सरकार येताच मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांना लॅाटरी लागल्याची चर्चा आहे
Mangesh Chavan
Mangesh Chavansarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांचे वर्चस्व व पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरखास्त केले. दूध संघातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश देत संघावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या नेतृत्वात आकरा जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. यामुळे शिंदे सरकार येताच चव्हाण यांना लॅाटरी लागल्याची चर्चा आहे.

मंगशे चव्हाण हे चाळीसगाव मतदास संघाचे आमदार आहे. ते माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जवळचे आहेत. त्यामुळेच त्यामुळेच त्यांची नियुक्ती प्रशासक मंडळावर करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुध संघावर प्रशासकाची नियुक्ती करुन शिंदे यांनी खडसे यांना धक्का दिला आहे. मात्र, या नियुक्तीमागे महाजन असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या माध्यमातून महाजन यांनी खडसे यांना धक्का दिला आहे.

Mangesh Chavan
Aurangabad : शिंदे गटाच्या नेत्याची भाजपलाच गुगली!

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन २८ दिवस झाले आहेत. तरीही राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे भाजपच्या इतर आमदारांना मंत्रीपदाची प्रतीक्षा आहे. मात्र, चव्हाण यांना संधी मिळाली आहे.

अवघ्या दोन महिन्यांवर दुध संघाची निवडणूक येऊन ठेपली आहे. असे असतानाही, दुध संघावर प्रशासकांची नियुक्ती करुन व चौकशी संमती नेमून भाजपने खडसे यांना कोंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. सन २०१५ मध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. त्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनल निवडून आले. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे दूध संघाच्या चेअरमन झाल्या होत्या. दुध संघावर प्रशासक आल्याने खडसे यांच्या वर्चस्वाला धक्का लागला आहे. जिल्ह्यातील सहकारावर खडसे यांचे एकहाती वर्चस्व आहे. मात्र, त्यांना आव्हाण देण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

प्रशासक मंडळ नियुक्त

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासनाने दूध संघावर आकरा जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. त्यात मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण याची तर प्रशासक मंडळात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, भुसावळचे अजय भोळे, पारोळ्यातून अमोल चिमणराव पाटील, जामनेर तालुक्यातून अरविंद देशमुख, चाळीसगाव तालुक्यातून राजेंद्र राठोड, माजी जि. प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, धरणगावचे गजानन पाटील, पाचोऱ्याचे अमोल शिंदे, भडगावचे विकास पाटील यांचा समावेश आहे.

Mangesh Chavan
Ajit Pawar यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बॅनर नाही, कॉंग्रेसच्या खासदाराची तऱ्हाच न्यारी..

एकनाथ खडसे यांचा आरोप

या बाबत एकनाथ खडसे 'सरकारनामा'शी बोलतना म्हणाले, दोन महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्याची यांची हिंमत नाही. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे. निवडणुकांना सामोरे जा. अडमार्गानी कशासाठी सत्ता घेता, असा सवाल खडसे यांनी केला. प्रशासक मंडळ नेमले, चौकशी समिती नेमली. दुध संध आम्ही नफ्यामध्ये आणला. गिरीश महाजन यांचे ऐकून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप खडसे यांनी केला. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आज दुध संघ भरभराटीला आला आहे, असेही खडसे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com