पोलिसांची हप्तेखोरी उघड करण्यासाठी आमदार बनले ट्रकचालक

रात्रभरात 2 ते 5 लाख रुपये वसुली होत असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला.
 Mangesh Chavan
Mangesh Chavan sarkarnama

जळगाव : चाळीसगाव येथील भाजप (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी ट्रक चालक होवून कन्नड घाटात पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीचे पितळ उघडे केले आहे. अतिवृष्टी मुळे कन्नड घाटात 9 ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले. अवजड वाहनांना कन्नड घाटातुन प्रवास करणे बंद असतांना महामार्ग, शहर वाहतूक आणि ग्रामिण पोलिसांची (Police) वाहने सोडण्यासाठी एक साखळी तयार झाली आहे. पैसे घेऊन वाहने सोडली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या त्यामुळे स्वतः आमदार चव्हाण यांनी ट्रक चालक बनून पोलिसांच्या हा हप्तेखोरीच स्टिंग केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला, त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले. व बाकी पैसे परत मागितले पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस त्यांना शिवीगाळ करायला लागला. चव्हाण गाडीच्या खाली उतरून पोलिसांशी बोलायला लागताच इतर पोलिसांनी तेथून धूम ठोकली.

 Mangesh Chavan
भाच्याला ईडीची नोटीस येताच ममता पंतप्रधान मोदींच्या भेटीला!

आमदाराला शिवराळ भाषा वापरण्यात आली. मंगेश चव्हाण ट्रकच्या खाली उतरताच पोलीसांनी धूम ठोकत पळ काढला. तुम्ही चोरांना पकडता मात्र नाईलाजाने आज तुम्हाला आम्हाला पकडावे लागत आहे. पळू नको इकडे या थांबा अस आमदार चव्हाण ओरडत होते. पोलीस आपली कातडी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे चित्र यावेळी दिसुन आले.

कन्नड घाटाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. आणि हे सहन होत नसल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले. रात्रीच्या चोऱ्या वाढल्या शेतकऱ्यांची गुरे चोरीला जात आहेत या प्रकरणी नाकाबंदी करावी, अशी मागणी मी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना केली होती.

 Mangesh Chavan
ठाकरे सरकारचा एक पैसाही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही, तो कुणाच्या खीशात गेला?

त्या कडे दुलक्ष करून चाळीसगाव ग्रामीण पोलीस महामार्गावर हप्तेखोरी करीत आहेत. हा सर्व प्रकार मी स्टिंग केला आहे. दोन दिवसांत जबादार पोलिसांना निलंबित करा नाहीतर नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षक यांच्या दालनात बसून राहील गृहमंत्री यांना माझा सवाल आहे. जागो जागी असे वसुली करणारे आपण बसवली आहेत का? गोर गरिबांची लूट मी होऊ देणार नाही. रात्रभरात 2 ते 5 लाख रुपये वसुली होत असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com