Ahmednagar : विखेंच्या जागेवर पडळकरांचा डोळा; म्हणूनच काढला नामांतराचा मुद्दा !

Maharashtra Politics : आपल्याच पक्षातून खरंच आव्हान तयार होणार का?
Gopichand Padalkar and Sujay Vikhe Patil
Gopichand Padalkar and Sujay Vikhe PatilSarkarnama

Maharashtra Politics : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न थेट विधीमंडळात उपस्थित केला. त्यानंतर राज्यासह जिल्ह्यात या मुद्द्याची चर्चा सुरु झाली. एवढंच नाही तर त्यानंतर भाजपच्या विखे पाटलांनी पडळकरांना सुनावलंही. मात्र असे असतानाच पडळकरांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न विधीमंडळात का उपस्थित केला? यामागे काय कारण आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पडळकरांनी नामांतराचा प्रश्न उपस्थित केल्याने ते येणाऱ्या निवडणुकीत नगर दक्षिणमधून लोकसभेची निवडणूक लढवणार तर नाहीत ना? अशी कुजबूज सुरु झाली आहे. जर असं झालं तर नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना पक्षातूनच आव्हान तयार होऊ शकतं. त्यामुळे विखेंच टेन्शन वाढू शकतं असं बोललं जात आहे.

Gopichand Padalkar and Sujay Vikhe Patil
Ahmednagar BJP : नगरच्या नामांतर आणि जिल्हा विभाजनावरून विखे पिता पुत्र भाजपमध्ये एकाकी...

त्यातच आता लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येवून ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारीला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार विखे हे देखील येणाऱ्या लोकसभेसाठी तयारीला लागले असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र गोपीचंद पडळकर हे जर अहमदनगरमधून (Ahmednagar) निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहत असलील तर भाजपमध्ये येणाऱ्या काळात चडावढ निर्माण होऊ शकते.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगलीत वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी 3 लाखांपेक्षा जास्त मते मिळवली होती. तर त्यानंतर पडळकरांनी थेट अजित पवारांना (Ajit Pawar) आव्हान देत भाजपकडून बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यात त्यांच डिपॉजिट जप्त झालं होतं. त्यानंतर ते भाजपकडून विधान परिषदेवर आमदार झाले.

Gopichand Padalkar and Sujay Vikhe Patil
Mumbai : तुपकरांच्या सुचनांचा गांभीर्याने विचार करावा.. फडणवीसांचे केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांना पत्र

मात्र, आता पडळकर सांगली, बारामतीसोडून आपला मोर्चा अहमदनगरकडे वळवण्याच्या मार्गावर आहेत. ते नगरमधून निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जर असं झालं तर सुजय विखेंना (Sujay Vikhe Patil) आपल्याच पक्षातून आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यामुळे विखेंचे देखील टेन्शन वाढू शकते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उचांवल्या आहेत. दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुजय विखेंना आपल्याच पक्षातून खरंच आव्हान तयार होणार का? की ही फक्त चर्चाच राहणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com