भाजपने बिनकामाच्या जमिनींवर जनतेचा पैसा उधळला!

छगन भुजबळांनी उपस्थित केले भाजपच्या कामावर प्रश्नचिन्ह
भाजपने बिनकामाच्या जमिनींवर जनतेचा पैसा उधळला!
Chhagan Bhujbal & NMC BuildingSarkarnama

नाशिक : मी मुंबईत (Mumbai) महापौर होतो. स्वायत्त संस्थांच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा नसतो, हे संकेत मी कायम पाळले. पण नाशिक (NMC) महापालिकेत आर्थिक बेशिस्तीमुळे कर्जाचा बोजा २८०० कोटी झाला आहे. भूसंपादित जमिनीचा काय उपयोग केला, म्हाडा (MHADA) प्रकरणी पूर्वीच्या आयुक्तांवर डाग लागला आहे. त्यामुळे नवीन आयुक्तांनी अनावश्यक कामे रद्द करावीत, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले.

Chhagan Bhujbal & NMC Building
सेट्रींगचे काम करणारा गणेश चव्हाण ठरला मानाच्या तलवारीचा विजेता!

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता होती. सध्या लोकप्रतिनिधींची राजवट संपून प्रशासकीय राजवट सुरू आहे. तसेच, काही दिवसांपासून महापालिकेच्या आर्थिक बेशिस्तीमुळे नवनियुक्त प्रशासकांनी काही मंजूर कामे रद्द केली आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी सोमवारी (ता. २५) महापालिकेत साडेतीन तास विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी होते. बैठकीनंतर श्री. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेउन महापालिकेतील आर्थिक बेशिस्तीचा पाढा वाचत महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सत्ताधारी भाजपच्या कामांची लक्तरे चव्हाट्यावर आणली.

Chhagan Bhujbal & NMC Building
महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे!

स्थायीतून आर्थिक बेशिस्तीचा पाढा

ज्या स्थायी समितीच्या आर्थिक बेशिस्तीची प्रकरणे पुढे येत आहे. त्याच स्थायी समितीच्या सभागृहात बैठक घेत पालकमंत्री भुजबळ यांनी महापालिकेच्या बेशिस्त कामकाजाविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित केले. ते म्हणाले, की विकासकामावरील खर्चाच्या दीडपट इतके कर्ज असू शकते. पण इथे १५०० कोटीऐवजी २८०० कोटी कर्ज त्यावरील व्याजाचा भूर्दंड बघता महापालिकेचा गाडा आर्थिक दृष्ट चक्रात रुतणार आहे. म्हणून हे गंभीर आहे.

नागरिकांना आर्थिक बेशिस्तीचे कारण कळाले पाहिजे. बांधकामांचे वारेमाप काम मंजूर केले आहे. खरोखरच एवढी कामे गरजेची आहे का, हे तपासून प्रशासकांनी अनावश्यक कामे त्वरित रद्द करावीत, त्यासाठी रस्त्यांच्या कामांचा आढावा घ्यावा.

सांडपाणी त्वरित रोखा

गोदावरी नदीपात्रात सांडपाण्याचे नाले सोडले आहेत. मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) असूनही सांडपाणी नदीत मिसळते, ती कामे त्वरित करावीत. पाणीपुरवठ्याच्या कामांचा आढावा घ्यावा. रुग्णालयात कोरोनाकाळात कोट्यवधीचा खर्च केला, पण सध्या अनेक यंत्र बंद पडले आहेत. त्यामुळे आउटसोर्सिंग करून सीएसआर फंडातून रुग्णालयाची कामे सुरू करावीत. नंदिनी नदीला नाल्याचे रुप आले आहे, त्यात लक्ष घालावे. उंटवाडी भागातील पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर दिली आहे. पण दुसऱ्याचे काम मात्र थांबविले आहे. दादासाहेब फाळके स्मारकाचे काम खासगी संस्थेला देण्याचे काम थांबविले आहे. इतरही अनेक अनावश्यक कामे स्थगित करणार असल्याचे सांगितल्याचे या वेळी स्पष्ट केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.