महिला आरक्षणाने भाजप महापौर सतीश कुलकर्णींची दांडी उडाली!

नाशिक महापालिका निवडणुकीत ६७ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले.
Satish Kulkarni News, Nashik Latest News in Marathi
Satish Kulkarni News, Nashik Latest News in MarathiSarkarnama

नाशिक : महापालिका (Nashik) प्रभाग रचनेची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. त्यात अनेक प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय वाटा अडल्या. भाजपचे (BJP) विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांचा प्रभाग महिला राखीव झाला. त्यामुळे त्यांना आपल्या कन्येला चाल द्यावी लागणार आहे. (NMC election womens reservation declaired today)

Satish Kulkarni News, Nashik Latest News in Marathi
शिवसैनिकांनो लाचार संजय राऊतांना आताच आवरा...गजानन काळे

महापालिका प्रभागरचनेची सोडत आज काढण्यात महाकवी कालीदास नाट्यगृहात महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यामध्ये १३३ प्रभागांतील ६७ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले.

Satish Kulkarni News, Nashik Latest News in Marathi
शिवसेनेच्या १४ नगरसेवकांची शिवसंपर्क अभियानाला दांडी!

या सोडतीत महापौर सतीश कुलकर्णी यांचा प्रभाग एसटी पुरुष तसेच सर्वसाधारण महिला राखील झाला. त्यामुळे महापौर यांच्या राजकीय वाटचालीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यांना उमेदवारी करणे शक्य नसल्याने त्यांची कन्या संध्या कुलकर्णी भाजपकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. श्री. कुलकर्णी गेले काही दिवस प्रकृतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नव्हते. महिला आरक्षणाने त्यांना विश्रांतीची संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, महापालिका स्थायी समितीचे सदस्य राहूल दिवे यांच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये सर्वसाधारण पुरष, एसटी पुरुष आणि मागासवर्ग महिला असे आरक्षण झाले आहे. त्यामुळे श्री. दिवे यांची कोंडी झाली आहे. त्यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यांनी गेले काही दिवस तशी तयारी सुरु केली होती. या प्रभागात त्यांच्या कुटुंबातील महिला व पुरुष असे दोघे उमेदवारी करण्याची शक्यता आहे.

शहरात १३३ जागांसाठी ६७ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १९, अनुसूचित १९ पैकी १०, अनुसूचित जमातींसाठी १० पैकी ५ जागा राखीव झाल्या.

प्रारंभी अनुसूचित जाती महिला राखीव गटासाठी चिठ्ठीद्वारे शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते आरक्षण काढण्यात आले. ते फेसबुकवर लाईव्ह करण्यात आले. अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असलेले प्रभाग असे, १२अ, १४अ, २६अ, ४१अ, ४३अ, ३४अ, ३५अ, ४४अ, २२अ आणि २७ अ. आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक तसेच विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in