महापौर म्हणतात, कर्मचारी आजारी, नोकरभरतीला परवानगी द्या!

महानगरपालिका आस्थापना परिशिष्टावरील रिक्त पदांवर नोकरभरतीची मागणी.
Mayor Satish Kulkarni

Mayor Satish Kulkarni

Sarkarnama

नाशिक : प्रशासन (NMC) निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशा स्थितीत भाजपने (BJP) मात्र पुन्हा एकदा नोकरभरतीचा डाव टाकला आहे. त्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहूनविनंती केली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे हे कार्ड चालेल का याची चर्चा आहे.

<div class="paragraphs"><p>Mayor Satish Kulkarni</p></div>
महापालिकेत कंत्राटदार गुजरातचा...यातना मात्र धुळेकरांना!

याबाबत महापौर म्हणतात, महापालिका १९८२ मध्ये अस्तित्वात आली . त्यानंतर आजपर्यंत शहराची लोकसंख्या २२ ते २४ लाखाच्या घरात गेलेली आहे. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर असलेल्या विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत. प्रत्येक महिन्यास सरासरी ३० ते ४० अधिकारी, कर्मचारी कमी होत आहेत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांचा पदभार आहे. कामाचा ताण वाढत आहे . अपुरे मनुष्यबळ असल्याने बऱ्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. काहींनी कामकाजाच्या तणावामुळे आत्महत्या सुध्दा केली आहे.

<div class="paragraphs"><p>Mayor Satish Kulkarni</p></div>
गुलाबराव पाटील म्हणाले, `आम्ही इतक्या खालच्या स्तराला जात नाही`

शहराची वाढती लोकसंख्या महानगरपालिकेची मोठया प्रमाणात वाढत असलेली कामाची व्याप्ती सिंहस्थ कुंभमेळा, नागरिकांना द्याव्या लागत असलेल्या सेवा, सुविधांच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. त्यामुळे नोकरभरतीची आवश्यकता भासत आहे. २४ वर्षांपासून कोणत्याही पदाची नोकर भरती झाली नाही. आजमितीस आस्थापना खर्च ३७ ते ३८ टक्के आहे. विविध करांची थकबाकी ५०० कोटी आहे. त्यामुळे या कामांसाठी नोकरभरतीची परवानगी द्यावी.

ते म्हणाले, नागरी सेवा सुविधा पुरविणे हे मनपाचे प्रथम कर्तव्य आहे . शहराची वाढती लोकसंख्या, कामाची व्याप्ती व अपुरा अधिकारी, कर्मचारी वर्ग आहे. बऱ्याच वर्षांपासून महापालिकेला ब वर्ग दर्जा मिळालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता कर्मचारी संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून आस्थापना खर्चाची मर्यादा शिथील करुन सफाई कामगार ते इंजिनिअर्सची विविध विभागातील रिक्त पदांच्या नोकरभरतीला त्वरित मान्यता मिळावी. त्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळास भेटीची वेळ द्यावी.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com