Rohit Pawar; महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट?

भाजप स्‍वतःकडे सत्ता ठेवण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

नाशिक : (Nashik) येत्या काही महिन्यांत राज्यावर (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. भाजपकडून (BJP) स्‍वतःकडे सत्ता ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट (Presindential Rule) लागू करण्याची शक्यता असून, त्‍यासाठीच नवीन राज्यपाल (Governer) आले असल्‍याचे वैयक्‍तिक मत असल्‍याचे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. (BJP wants to keep Ruling in Maharashtra Government in any how case)

MLA Rohit Pawar
Ramdas Athawale; किती दिवस इतरांच्या कुबड्या घेऊन पक्ष चालवू?

पोटनिवडणुकांमध्ये मतविभागणीसाठी अपक्षांना रिंगणात उतरवत, दुसरीकडे मतदारांना भाजपकडून पैसेवाटप केले जात असल्‍याची टीका त्‍यांनी केली. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ता आपल्याच हाती ठेवायची आहे.

MLA Rohit Pawar
Nashik Congress; निस्तेज नेत्यांत आत्मघातकी गटबाजी पुन्हा सुरु!

युवकांशी संवादाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मध्यावधी निवडणुका लागतील की नाही, हे सांगता येत नाही. कदाचित लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतात.

परंतु येत्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट नक्की आहे. नामांतरणाच्‍या मुद्यावर श्री. पवार म्‍हणाले, की आम्‍ही तेव्‍हाच स्‍वागत केले होते. महाविकास आघाडीत तेव्हाच निर्णय झाला होता.

गोपीचंद पडळकरांच्‍या नगर नामांतरणाबाबतच्‍या ट्विटवर ते म्‍हणाले, की लोकांचे मत जाणून घेतले पाहिजे व राजकारण न करता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. परंतु केवळ नामांतरणाचा विषय न घेता अन्‍य महत्त्वा‍च्‍या प्रश्‍नांवरही चर्चा झाली पाहिजे.

भाजपच्‍या काही कार्यकर्त्यांना पैसेवाटप करताना पकडले आहे. भाजप किती आर्थिक ताकद लावली आहे, कशा प्रकारे अपक्ष उमेदवारांना मतविभाजणासाठी निवडणुकीत उतरविले हे काही दिवसांत समोर येईलच, असा दावा त्‍यांनी केला.

यावेळी आमदार पवार म्‍हणाले, पहाटेच्‍या शपथविधीवर चर्चेऐवजी नागरिकांच्‍या समस्‍यांवर चर्चा होण्याची गरज आहे. मात्र भाजपकडून सहानुभूतीसाठी सध्याचे राजकारण सुरू आहे. त्यांचा भर भावनिक राजकारण करण्यावर त्यांचा भर आहे. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलले जाते आहे. त्याएैवजी सोयीसाठी आयातांना अधिक संधी दिली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in