भाजप लोकप्रतिनिधींना सत्ता नसल्याची झळ बसल्याने अस्वस्थता!

रावेर पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांशी पंचायत समितीच्या सदस्यांनी जाब विचारला.
BJP members at raver Panchayat Samaiti office
BJP members at raver Panchayat Samaiti officeSarkarnama

रावेर : पंचायत समिती सदस्यांना मिळणाऱ्या निधीच्या असमान वाटपावरून तालुक्यातील वातावरण ऐन थंडीत गरम झाले आहे. शुक्रवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी पंचायत समितीच्या किमान ६ सदस्यांनी आपल्या विकास कामाच्या निधीवरील येऊ पाहणारी ‘संक्रांत’ टाळण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे. आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कोर्टात हा चेंडू गेल्याने त्यात भर पडणार आहे.

BJP members at raver Panchayat Samaiti office
शिवसेना, भाजपच्या वादात छगन भुजबळ काढणार तोडगा!

रावेर पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच असे असमान विकास निधी वाटपाचे षड्‌यंत्र रचण्यात आल्याचे सत्ताधारी भाजप, विरोधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या चौघा सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे असमान निधी वाटपाचे कटकारस्थान रचल्याचा गंभीर आरोप या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

BJP members at raver Panchayat Samaiti office
अमित देशमुखांच्या आशीर्वादाने राज्याच्या सीमेवर सर्वात मोठा जुगाराचा अड्डा?

शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य प्रा. डॉ. प्रतिभा बोरोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य योगेश पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ नेमाडे, महेश चौधरी, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ कोळी आणि तुकाराम बोरोले यांनी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पंचायत समितीच्या विकास निधीतून सदस्यांना होणाऱ्या असमान वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केला. प्रा. डॉ. बोरोले यांनी यावेळी सांगितले, की पंचायत समितीला पूर्ण तालुक्यातील विकास कामांसाठी मिळणाऱ्या १ कोटी ५६ लाख रुपये निधीतून ८२ टक्के निधी हा फक्त ४ सदस्यांना देण्याचा घाट रचण्यात आला आहे. अन्य ४ सदस्यांना प्रत्येकी फक्त ७ लाख रुपये मिळणार आहेत तर उर्वरित ४ पंचायत समिती सदस्यांना या विकास कामांमध्ये एक पैसाही देण्यात येणार नसल्याचे या प्रस्तावात दिसत आहे.

रावेर पंचायत समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात सभापतींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही समान विकास निधी मिळत आला आहे; मात्र आता सत्तेचा वापर करून परस्पर अशा प्रकारचे अन्याय वाटप होत असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.

या प्रस्तावानुसार जितेंद्र पाटील ४१ लाख रुपये, धनश्री सावळे ३१ लाख ५८ हजार रुपये, सभापती कविता कोळी ३४ लाख ३८ हजार रुपये आणि भाजपचे गटनेते पी. के. महाजन यांना ३० लाख २० हजार रुपये, असा विकास निधी देण्याचे प्रस्तावित आहे तर भारतीय जनता पक्षाच्या अनिता चौधरी आणि जुम्मा तडवी, शिवसेनेच्या रुपाली कोळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पाटील यांना प्रत्येकी ७ लाख रुपयांची कामे देण्याचे प्रस्तावित आहे. भाजपचे सदस्य असलेल्या माजी सभापती माधुरी नेमाडे आणि योगिता वानखेडे तसेच काँग्रेसच्या प्रा. बोरोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश पाटील यांना या प्रस्तावित कामात एक रुपयाही निधी देण्यात आलेला नाही.

चेंडू खडसेंच्या कोर्टात

निधीचे असमान वाटप करण्यात पुढाकार घेणारे भाजपचे काही कार्यकर्ते आणि पंचायत समिती सदस्य या प्रश्नावर मधला मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे गेल्याचे विश्वसनीय वृत्त ‘सकाळ’च्या हाती लागले आहे. ते चौघे कोण, याबाबत तालुक्यात चर्चेला ऊत आला आहे. या असमान निधी वाटपाची पहिली तक्रार भाजपच्या सदस्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या योगिता वानखेडे यांनी श्री. खडसे यांची भेट घेऊन केली होती.

षड्‌यंत्र हाणून पाडू : प्रा. बोरोले

आमच्या हक्काच्या विकास कामांवर आणि निधीवर अशी संक्रांत आम्ही सहन करणार नाही; त्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने वरिष्ठ पातळीपर्यंत लढा देऊ. मागील पंचायत समितीच्या बैठकीत आम्हाला विकास कामांचे प्रस्ताव देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आम्ही प्रस्ताव सादर केले होते, पण आम्हाला अंधारात ठेवून आमचे प्रस्ताव डावलून, सर्व निधी सत्ताधाऱ्यांच्या घशात जाऊ देण्याचे षड्‌यंत्र आम्ही हाणून पाडू असेही प्रा. डॉ. प्रतिभा बोरोले यांनी सांगितले.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com