भाजपचे नेते म्हणतात, महाराष्ट्र अभी बाकी है...!

इतर राज्यातील विजयाचा भाजपकडून जल्लोष
BJP Celebration at Dhule
BJP Celebration at DhuleSarkarnama

धुळे : उत्तर प्रदेश, (Uttar Pradesh) उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्याबद्दल भाजपच्या (BJP) येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथे जल्लोष केला. ‘यूपी, गोवा झाकी है- महाराष्ट्र अभी बाकी है’, अशा घोषणा देत महाराष्ट्रातही (Maharashtra) सत्ता परिवर्तन होईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

BJP Celebration at Dhule
महापौर सतीश कुलकर्णी रणांगणात उतरणार नाही!

पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चारही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविल्याबद्दल शहरातील गुरूशिष्य स्मारकाजवळील भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.

BJP Celebration at Dhule
नाशिकमध्ये `आप`चा जल्लोष, पंजाबच्या विजयाने नवीन राजकीय पर्याय!

यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, भगवान गवळी, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, अल्पा अग्रवाल, प्रतिभा चौधरी, योगिता बागूल, हिरामण गवळी, अमोल मासुळे, युवराज पाटील, नागसेन बोरसे, बबन चौधरी, नरेश चौधरी, महादेव परदेशी, रावसाहेब नांद्रे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा यात सहभाग होता.

जनतेने टाकलेल्या विश्‍वासाला भाजप तडा जाऊ देत नाही. त्यामुळे जनता वारंवार भाजपला संधी देते, अशी प्रतिक्रिया नगरसेवक गवळी यांनी दिली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध घोषणाही दिल्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com