धास्तीमुळेच पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिले नाही!
Jayant PatilSarkarnama

धास्तीमुळेच पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिले नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानाच्या कार्यक्रमाबाबत मतप्रदर्शन केले.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या यापुर्वीच्या पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महापालिकेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहींना खडे बोल सुनावले होते. तेव्हापासून भाजप (BJP) नेत्यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच काल पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात अजित पवारांना बोलू दिले नसावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश (NCP) अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. (NCP leader Jayant Patil show his unwilingness on BJP)

Jayant Patil
दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करा!

पंतप्रधान मोदी काल पुणे दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी देहू संस्थांनच्या संत तुकाराम शिळा मंदीराचे लोकार्पण केले. यावेळी लोहगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले होते.

Jayant Patil
राज ठाकरेंच्या वाढदिवशी ५४ रुपये लिटर पेट्रोल विक्रीचा स्टंट गेला फेल!

त्यानंतर झालेल्या सभेच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र बोलू दिले नाही. त्यामुळे तो टिकेचा विषय बनला होता. हा महाराष्ट्राचा अवमान झाला, अशी टिका करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

या विषयावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांना का बोलू दिले नसावे, याचे कारणच सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी यापूर्वी पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. महापालिकेत भाजप सत्तेत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत काही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. काहींनी त्याची चांगलीच धास्ती घेतली होती. भाजपच्या नेत्यांना जी धास्ती वाटते. त्या धास्ती पोटीच त्यांनी षडयंत्र केले. त्यातूनच पवार यांना बोलू दिले नाही. हे चांगले झाले नाही. असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

देहू संस्थानच्या याच कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मिळाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असुनही अजित पवार यांना बोलण्याची संधी नाही, हे योग्य दिसते का?. असा प्रश्न त्यांनी केला.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in