शिंदे गट-भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर : दादा भुसेंना पालकमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी

याच मुद्द्यावरुन एका शेतकऱ्याने शनिवारी (३ डिसेंबर) विष प्राशन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

Dadaji Bhuse news : बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे. यामुळे नाशकात सध्या शिंदे गट आणि भाजपमध्येच वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दादा भुसे यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

दादा भुसे यांनी मालेगावमधील बोरी -आंबेदरी धरणाची पाटकॅनॉल चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी नेल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सदर योजनेला विरोध करत ७ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरुन एका शेतकऱ्याने शनिवारी (३ डिसेंबर) विष प्राशन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी नेल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीनीला पाणी मिळणार नाही. परिणामी पिके उद्ध्वस्त होण्याची भिती शेतकरी आणि भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. असे असताना दादा भुसे मात्र चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी पिण्याचा घाट घालत आहेत. असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या या मागणीवर फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Dada Bhuse
PCMC News : उपायुक्त झगडेंच्या नियुक्ती रद्दला व आता नोटीसीला राजकीय किनार

गेल्या २८ दिवसापासून बोरी आंबेदरी येथे आंदोलन सुरु आहे. तरीही राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्याने आज शेतकरी आणि भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंदिस्त जलवाहिनी योजनेस शिवसेना, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. या पाइपलाइनमुळे परिसरातील चार ते पाच गांवामधील शेती कोरडी पडेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, अशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. तसेच शेतकऱ्यांचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी राज्य शासनाची राहील, असा इशाराही अद्वय हिरे यांनी आहे. त्यामुळे पालकमंत्री भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com