Dr. Subhash Bhamre, Girish Mahajan & Jaykumar Rawal
Dr. Subhash Bhamre, Girish Mahajan & Jaykumar RawalSarkarnama

भाजप नेत्यांची मंत्र्यांना विनवणी, दुष्काळग्रस्तांना मदत करा!

आमदार रावल यांची पालकमंत्री महाजन यांच्याकडे मागणी

धुळे : शिंदखेडा (Shindkheda) मतदारसंघात एकीकडे भीषण असा कोरडा दुष्काळ (Draught) असून, दुसरीकडे ओला दुष्काळ आहे. कुठे जास्त पावसामुळे, (Raunfall) तर कुठे कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय (Government relief for farmers) मदत करण्यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (Jaykumar rawal) यांनी पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे केली. (BJP leaders deemand drought relief for farmers)

Dr. Subhash Bhamre, Girish Mahajan & Jaykumar Rawal
Shivsena: शिंदे गटाच्या कारकर्त्यांना चोपणाऱ्या रणरागिणींचा शिवसेनेकडून सन्मान

शिरपूर दौऱ्यावर असताना, पालकमंत्री महाजन यांना खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत आमदार रावल यांनी शेतकरी मदत करण्याच्या मागणीचे पत्र दिले. आमदार अमरीशभाई पटेल उपस्थित होते. आमदार रावल यांनी सांगितले, की शिंदखेडा मतदारसंघात दरवेळी दुष्काळी स्थिती असते. यंदा मात्र वेगळी स्थिती असून, दोंडाईचा परिसरातील अनेक गावांना कमी पावसामुळे आजच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

Dr. Subhash Bhamre, Girish Mahajan & Jaykumar Rawal
जनता रडकुंडीला... आमदार सुरेश भोळेंच्या मात्र जोर बैठका!

पाऊस न झाल्याने खरिपातील पिके करपली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात आहे. यात प्रामुख्याने दोंडाईचा, शेवाडे आणि विखरण महसूल मंडलाचा समावेश आहे. या भागात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तर दुसरीकडे बेटावद भागात अति पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तिकडे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत प्रशासनाला आदेश देत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासह भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर वेळीच नियोजन करावे, अशी मागणी आमदार रावल यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे केली. ---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com