Dhulecorporation meeting
Dhulecorporation meetingSarkarnama

भाजप नेत्यांतच जुंपली, तुम्ही महापालिकेची ग्रामपंचायत करून टाकली!

धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी अन् विसंवादाचा सामना

धुळे : भाषा व्यवस्थित वापरा, असंसदीय शब्द वापरू नका... माझ्यावर भाजपचे (BJP) संस्कार, त्यामुळे मला शिकवू नका... तुमचे भाजपबद्दल काय मत आहे हे मला माहीत आहे, असा एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रकार. समस्या सुटत नसतील, तर महापालिकेला (Dhule corporation) ग्रामपंचायत करून टाका, असा घरचा आहेर. पाणीपुरवठ्याप्रश्‍नी (Water supply) नागरिक आमच्या घरांवर मोर्चे आणत आहेत. त्यामुळे समस्या सुटली नाही, तर आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करू असा इशारा, असा सभापती विरुद्ध सत्ताधारी सदस्य असा खडाजंगी अन् विसंवादाचा सामना स्थायी समितीच्या सभेत पाहायला मिळाला.

Dhulecorporation meeting
‘नदीजोड’साठी राज्यांची संयुक्त बैठक बोलवा

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात झाली. सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य नागसेन बोरसे यांनी आपण उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर खुलासा होत नसल्याचा मुद्दा मांडला. अगोदर खालीच निर्णय होतो. सभेत माझा केवळ विरोध नोंदवून घेतला जातो. आम्ही येथे मागणी करायची तुम्ही मात्र काहीच करायचे नाही, असे श्री. बोरसे म्हणाले.

Dhulecorporation meeting
डीएनए चेक करो, सलीम शेख तुम मुसलमान नही हो सकते!

या बोलण्याच्या ओघातच त्यांनी शिलगावले, असा शब्द वापरला. त्यावर सभापती श्री. नवले यांनी भाषा व्यवस्थित ठेवा, असंसदीय शब्दाचा वापर करू नका, असे सुनावले. त्यावर श्री. बोरसे माझ्यावर पक्षाचा संस्कार आहे, मला शिकवू नका, मी वापरलेला शब्द असंसदीय नाही, असे प्रतिउत्तर दिले. श्री. नवले, श्री. बोरसे यांच्यातल्या या खडाजंगीमुळे सभागृहातील वातावरण तापले.

...तर चारच नगरसेवक असते

नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी तीन वर्षांपासून ज्या समस्या मांडतो आहे त्या जैसे थे असल्याचे सांगितले. आपली शासकीय यंत्रणा त्या योग्यतेची नाही का?, आपण सक्षम नसल्याने महापालिकेलाच ग्रामपंचायत करून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदविली. प्रभाग समित्या गठित केल्या, तर समस्या सुटण्यास मदत होईल. त्यावर सभापती नवले यांनी मनुष्यबळ कमी आहे, आकाशच फाटले आहे, असे सांगितले. त्यावर नगरसेवक रेलन यांनी आभाळ फाटलं, म्हणूनच आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे, अन्यथा भाजपाचे चारच नगरसेवक राहिले असते, असा टोला हाणला.

ते रजिस्टर नकली

हद्दवाढ क्षेत्रात ग्रामसेवकांसह लोकप्रतिनिधी, भुमाफियांनी गावठाण जागांचे प्लॉट पाडून विकले. वलवाडी ग्रामपंचायतीचा लिपिक श्‍याम चौधरी याने रजिस्टरमध्ये व्हाईटनरने खोडाखोडीचा प्रकार केला आहे. महापालिकेकडे असलेले गावठाणचे रजिस्टर नकली आहे, असा दावा संजय जाधव यांनी केला. प्रशासनाने मात्र संबंधित लिपिक चौधरीला साधी कारणे दाखवा नोटीसही दिली नसल्याचे सांगितले. त्यावर सभापती नवले यांनी माझ्या दालनात या विषयावर बोलू, असे सांगितले.

नागरिकांचे घरावर मोर्चे

सदस्या किरण कुलेवार यांनी आपल्या प्रभाग सातमध्ये पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचा मुद्दा मांडला. नागरिक आमच्या घरावर मोर्चे घेऊन येतात. रमजान महिना सुरू आहे, डॉ. आंबेडकर जयंती येत आहे. त्यामुळे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, पंधराव्या वित्त आयोगातून जलकुंभासाठी निविदा काढावी, अन्यथा आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करू, असा इशारा दिला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com