Dhule APMC election News: यंदा काँग्रेसची सत्ता खालसा करणार!

धुळे बाजार समिती निवडणुकीत भाजप स्वबळावर पॅनेल करणार
Dr. Subhash Bhamre
Dr. Subhash BhamreSarkarnama

BJP contest election with Own : धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात राहिली. त्या काळात भ्रष्टाचार वाढला. तो रोखण्यासह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाजार समिती भाजपच्या ताब्यात द्यावी. यानंतर तिचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. त्यांच्या सुरात सूर मिसळत समितीत भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार नेतेमंडळींनी केला. (BJP leaders will soon declare panel for Dhule APMC)

येथील (Dhule) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC election) निवडणुकीसंदर्भात शनिवारी दुपारी राम पॅलेस येथे भाजपतर्फे (BJP) शेतकरी, मतदारांचा मेळावा झाला. त्यावेळी खासदार डॉ. भामरे (Dr. Subhash Bhamre) बोलत होते. लवकरच निवडणुकीचे पॅनल (Trible) ठरणार आहे. भाजप उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

Dr. Subhash Bhamre
Chhatrapati Sanyogitaraje Issue : अवमान करणारा पुजारी सुधीरदास वादग्रस्तच!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, बापू खलाणे, देवेंद्र पाटील, संजय शर्मा, रावसाहेब गिरासे, संग्राम पाटील, विजय पाटील, राम भदाणे, नरेश चौधरी, आशुतोष पाटील, शंकर खलाणे, गजेंद्र अंपळकर, महादेव परदेशी आदी उपस्थित होते.

मेळाव्यात बाजार समितीची निवडणूक क्षमतेने लढण्याचा निर्धार भाजपने केला. यात समितीत सत्ता मिळवून पारदर्शकपणे कारभार केला जाईल, असा विश्‍वास मान्यवरांनी दिला. नेते श्री. देवरे यांनी त्यांच्या कार्यकाळात कुशलतेने बाजार समितीचे कामकाज केल्याचे स्पष्ट केले. त्यांनी साडेसात कोटींचे कर्ज असलेल्या बाजार समितीचे सर्व कर्ज फेडून बाजार समितीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

Dr. Subhash Bhamre
Pimpalgaon APMC election news : दिलीप बनकर आणि अनिल कदम राजकारण तापले!

श्री. कदमबांडे यांनी बाजार समितीत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अडीअडीचणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही दिली. डॉ. भामरे म्हणाले, भाजपची नेतेमंडळी संघटित असून कुणीही अफवांना बळी पडू नये. राज्यातून किंवा केंद्रातून बाजार समितीसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल.

Dr. Subhash Bhamre
Karnatak Assembly Election : कर्नाटकमध्ये सत्ता राखण्यासाठी नरेंद्र मोदींच्या तब्बल 'एवढ्या' सभा!

समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र पाटील, भाऊसाहेब देसले, रावसाहेब पाटील, संग्राम पाटील यांची प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सहा महिने विरोधकांचा घाम काढला. सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना कुठलीही तक्रार करण्याची वेळ भविष्यात येणार नाही. तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब गिरासे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com