सुभाष भामरे म्हणतात, दिवाळीपासून धुळ्यात रोज पाणी!

धुळे येथील अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाचा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आढावा घेतला.
सुभाष भामरे म्हणतात, दिवाळीपासून धुळ्यात रोज पाणी!
Dr Subhash BhamreSarkarnama

धुळे : महापालिकेत (Dhule) भाजपची (BJP) बहुमताने सत्ता आल्यानंतर धुळेकरांना रोज पाणी देऊ. त्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना मार्गी लाऊ, असा शब्द दिला होता. तो पूर्णत्वाकडे असून दिवाळीपासून धुळेकरांना रोज पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांनी आज दिली. (Dhule city will avowal from water scarcity)

Dr Subhash Bhamre
रशीद शेख म्हणाले, आयुक्त जुम्मा के जुम्मा काम करतात!

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाची खासदार डॉ. भामरे यांनी बुधवारी सायंकाळी अक्कलपाडा प्रकल्पस्थळी पाहणी केली. माजी महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समिती सभापती शीतल नवले, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसेवक सुनील बैसाणे, राकेश कुलेवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता निकम, मनपाचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, श्री. बागूल व ठेकेदाराचे प्रतिनिधी आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Dr Subhash Bhamre
आयुक्त विद्या गायकवाड यांनी रस्त्यावर उतरून केली पेव्हर ब्लॉकची तपासणी!

खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले, की अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना मार्गी लावताना जीवन प्राधिकरण व सिंचन विभागात समन्वय घडवून आणला. तसेच प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले. त्यामुळे योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेव्दारे दिवाळीपर्यंत धुळेकरांना रोज पाणीपुरवठा करता येईल. यात प्रकल्पस्थळी जॅकवेलचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्णत्वास आले असून जलशुद्धीकरण केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

पाइपलाइनच्या कामातील सर्व अडथळे व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. वितरण वाहिनीचे कामही ९० टक्के पूर्णत्वास आहे. कामाची स्थिती समाधानकारक आहे. योजना पूर्णत्वाला गती मिळाल्याने खासदारांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण योजनेचे सरासरी ८५ टक्के काम पूर्णत्वाकडे आहे. दिवाळीपर्यंत नियमित व उच्च दाबाने रोज पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने खासदार डॉ. भामरे व श्री. नवले यांनी सांगितले. या योजनेमुळे गुरूत्वाकर्षणाने पाणी येणार असून त्यामुळे महापालिकेच्या वीज बिलात बचत होणार आहे.

तापी पाणीपुरवठा योजना जुनी झाली असून ती पांढरा हत्ती ठरली आहे. या योजनेसाठी महापालिकेला दरमहा दीड कोटींचे वीजबिल भरावे लागत आहे. शिवाय रोजच्या गळत्यांमुळे लाखो रूपये खर्च होत आहे. यात अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेमुळे बचत होऊ शकेल, असेही खासदारांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in