संजय काळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचा भाजपला जोर का झटका!

खासदार अरविंद सावंत यांनी भाजप नेते संजय काळे यांनी शिवसेनेत स्वागत केले.
संजय काळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचा भाजपला जोर का झटका!
Sanjay Kale with Arvind SawantSarkarnama

इंदिरानगर : शहर (Nashik) आणि जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) नेत्यांचे शिवसंपर्क अभियान जोमात सुरु आहे. यातील बव्हंशी कार्यक्रम भाजपच्या (BJP) बालेकिल्ल्यात होत आहेत. यातून भाजपला थेट आव्हान देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. यातच नुकताच खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या उपस्थितीत भाजप नेते संजय काळे यांचा प्रवेश करून घेत शिवसेनेने भाजपला धक्का दिला. (Shivsena given political jerk to BJP in Nashik)

Sanjay Kale with Arvind Sawant
आनंदवल्ली भागातून शिवसेनेचा आमदार पाठवा

चेतनानागरमध्ये शिवसंपर्क अभियानातंर्गत झालेल्या मेळाव्यात खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत इंदिरानगरमधील सुखदेव एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या भागात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

Sanjay Kale with Arvind Sawant
राणेंची जीभ पुन्हा घसरली; मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत अन् शिव्यांची लाखोली वाहत टीका

चेतनानगरमधील भागवत सभागृहात शिव संपर्क अभियानांतर्गत मेळावा झाला. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, शरद गिते, प्रफुल्ल भोसले, देवानंद बिरारी, अमोल जाधव, संगीता जाधव, सागर देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, की भारतीय जनता पक्षाने जे काय काम केले हे जनतेला सांगितले पाहिजे. ७० वर्षांत जे कमावले ते आज भाजप विकत आहे. ‘हम दो, हमारे दो’ देश चालवित आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. इडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्राला बदमान करण्याचे काम भाजप करीत आहे. शिवसेनेचे कार्य शिवसैनिकांनी घराघरांत पोहोचवले पाहिजे.

या वेळी बंडू दळवी, दीपक पंडित, शैलेश कार्ले, रंजय काळे, स्वप्नील वाघ, धीरज जोशी, विजय काळे, करूणा धामणे, रत्नाबाई काळे, शोभा दोंदे, विठाबाई पगार, पूनम पंडित यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in