पैसे वाटले, तरीही त्यांचा पराभव झाला : जयकुमार रावल

जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी आमदार कृणाल पाटील त्यांच्यावर पलटवार करीत ठाकरे सरकारवर (Thackeray government) गंभीर आरोप केला आहे.
पैसे वाटले, तरीही त्यांचा पराभव झाला : जयकुमार रावल
Jayakumar Rawal, Kunal Patil sarkarnama

धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule ZP Election) निवडणुकांचे बहुतांश निकाल हाती आले आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीचे आमदार कुणाल पाटील (mla Kunal Patil) यांनी महाविकास आघाडीने बहुतेक जागांवर भाजपला धूळ चारली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपचे नेते जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी त्यांच्यावर पलटवार करीत ठाकरे सरकारवर (Thackeray government) गंभीर आरोप केला आहे.

माजी पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांना महाविकास आघाडीवर गंभीर टीका केली आहे. ''महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या, पैसे वाटले. तरी देखील पराभव झाला. बिघाडी सरकारच्या वसुली विरोधात जनतेने कौल दिला,'' असा गंभीर आरोप जयकुमार रावल यांनी केला आहे.

बहुतांश जागांवर भाजपला रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. भाजपला मतदारांनी नाकारलं असल्याची प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी दिली. तर दुसरीकडे मात्र, धुळे जिल्हा परिषदेवर भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी व बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन जागांची आवश्यकता होती, परंतु शिंदखेडा येथेच चार जागांपैकी तीन जागा भाजपने मिळवत माजी मंत्री जयकुमार रावल यांनी आपला गड राखण्यात पुन्हा यशस्वी झाले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वसुली विरोधात कौल दिला असल्याची प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी दिली आहे.Jayakumar Rawal, Kunal Patil
ZP Election : नंदुरबारमध्ये सत्ता राखली, पण शिवसेनेचं उपाध्यक्षपद धोक्यात

धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत (Dhule ZP Election) शिरपूर तालुक्यात आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांनी आपले वर्चसव कायम राखले आहे. या गटात आठही जागा भाजपकडे गेल्या आहेत. आमदार अमरीश पटेल हे पूर्वी काँगेस पक्षात होते. त्या वेळी शिरपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेस चे वर्चस्व होते. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी आपला दबदबा कायम राखला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in