Chitra Wagh: चित्रा वाघ यांनी दिली महागाईची कबुली!

चित्रा वाघ म्हणतात मंत्री संजय राठोडांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू आहे.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

जळगाव : महागाईमुळे (Inflation) महिलांचे (Womens) किचन बजेट कोलमडले आहे. मात्र, ‘कोरोना’मुळे (Covid19) जागतिक मंदीचे संकट होते. त्यामुळे अनेक देशांतील अर्थव्यवस्था कोलमडली होती. श्रीलंकेत तर लोकांनी उठाव केला होता. अशाही स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात धान्य योजना राबवून जनतेला दिलासा दिला. जागतिक मंदीमुळे महागाईची झळ बसली आहे. आजवर भाजप (BJP) नेते महागाई नाहीच, असा दावा करत होते. त्यांचा हा दावा चित्रा वाघ (Chitra Wagh) अप्रत्यक्षरित्या खोडला आहे. (BJP leader Chitra Wagh claim inflation will go down in Future)

Chitra Wagh
Chhagan Bhujbal; कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये

भारतातही त्यामुळेच महागाई आहे. येत्या काळात मात्र महागाई कमी करण्याकडे केंद्र व राज्य सरकार लक्ष देईल, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Chitra Wagh
Surgana Issue; दादा भुसे संतापल्यावर `राष्ट्रवादी` नेत्यांनी घेतली माघार!

येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. आमदार सुरेश भोळे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’चे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकार चांगले

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कार्याचे चित्रा वाघ यांनी कौतुक केले. त्यांनी गेल्या १२७ दिवसांत राज्यात अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध आपली लढाई सुरूच आहे. त्यांच्याविरुद्ध आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रस्त्यावरची लढाई आता संपली असून, न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात आपल्याला यश मिळेल, याची खात्री आहे.

महिला अपमानाचे ‘सिलेक्शन’नको

कोणत्याही महिलेचा अपमान म्हणजे सर्व महिलांचा अपमान, असे आपण मानतो. अलीकडे काही सिलेक्टेड महिलांबाबत वक्तव्य केल्यास तो महिलांचा अपमान म्हणून बोलले जाते, हे चुकीचे आहे, असे आपण चालू देणार नाही. अगदी शेतातील मजूर महिलांचा अपमान झाला, तरी तो महिलांचा अपमान आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेचा अपमान झाला असेल, तर त्याचा आपण निषेध करतो.

महिला संरक्षण कायदा

धर्मांतर करून राज्यात अल्पवयीन मुलींना फसविण्यात येत आहे. त्यांना फूस लावून पळवून नेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथेही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने मुलींना संरक्षण देण्याचा कायदा केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशी आपली मागणी आहे. त्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com