..म्हणून लोक शिवसेनेला कंटाळले होते; मुख्यमंत्री शिंदे फक्त कारण झाले

BJP|Shivsena|Shivsena|Girish Mahajan : आपले अपयश लपवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर टीका करत आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi News
Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi NewsSarkarnama

Girish Mahajan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगत आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षात भाजपचा काहीही हात नसुन आपले अपयश लपवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना (Shivsena) भाजपच्या (BJP) नावाने बाऊ करत आहेत. आता आगामी निवडणुकीत त्यांनी आपली ताकद दाखवावी, असे आव्हानही महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे.

Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi News
मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी फक्त दोनच खासदारांचा होता आग्रह; बारणेंचा गौप्यस्फोट

महाजन म्हणाले, लोकांना आता जमीनीवरचा आणि लोकांचे सुख-दु:ख समजून घेणारा नेता पाहीजे. मुख्यमंत्री शिंदे फक्त कारण झाले आहे. यामुळेच त्यांच्या मागे गावापासून सर्वच कार्यकर्ते चालले आहेत. यामागच एकच कारण की लोकांना आता लोकांमधला नेता हवा आहे. यामळे हा बदल घडत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठलाही हात नाही. मात्र, आपल अपयश लपवण्यासाठी ते आमच्यावर टीका करत आहेत, असा टोला महाजनांनी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना लगावला आहे.

Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi News
ठाकरेंनी केलेली हकालपट्टी शिंदेंनी पुन्हा धुडकावली; खासदार जाधवांना अभय

भाजपने आपला ठसा हा राज्यासह देशात आप उमटवला आहे. आधी ते आमच्यासोबत होते. तेव्हा त्यांना कळाले की त्यांचे किती लोक निवडून येतात. मात्र, ठाकरेंनी आता आपला ठसा उमटवून दाखवावा. आता मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने घोडा-मैदान समोर आहे. त्यांना पराभव दिसत असल्यानेच ते भाजपावर आपल्या अपयशाच खापर फोडत आहेत. आता त्यांनी या निवडणुकीत किती लोकांना निवडूण आणतात यावरून त्यांच अस्तित्व त्यांना कळेल, असे आव्हान महाजनांनी ठाकरेंना दिले.

Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi News
नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात...; निलेश राणेंनी शिवसनेला डिवचले

दरम्यान, महाजन यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागतील गोरजाबारी येथे जात त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांसोबत राष्ट्रपती द्रैापदी मुर्मू यांच्या विजयाचा आनंद साजरा केला यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि शिवसेनेवर टीका केली आहे. काल ठाकरे यांनी शिवसेनेतील पडलेल्या फुटीला भाजप जबाबदार असल्याची टीका केली होेती. त्यांच्या याच टीकेला महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in