Minister Girish Mahajan
Minister Girish MahajanSarkarnama

Girish Mahajan : शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील ; भाजपचा शिवसेनेला टोला

Girish Mahajan : ग्रामपंचायत निवडणुकीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. आगामी जिल्हा परिषद,नगरपालिका निवडणुकीत ते दिसणारही नाहीत," असे महाजन म्हणाले.

जळगांव : शिवसेना कुणाची, असा वाद ठाकरे-शिंदे गटात सुरु असताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना भवनावरुन ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. (Girish Mahajan news update)

"शिवसेनेने (Shiv Sena)आमच्याशी गद्दारी केली त्याची फळे त्यांना भोगावी लागत आहेत, आमदार,खासदार गेले,मैदानासाठी भांडण करताहेत. उद्या ते शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या करतील," असा टोला भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला आहे.

महाजन जामनेर येथे सभेत बोलत होते. ते म्हणाले, "शिवसेनेने आमच्याशी गद्दारी करून काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले, त्याची फळे ते आता भोगत आहेत. आज त्यांचे 55 पैकी 40 आमदार गेले, 15 पैकी 12 खासदार गेले, आता त्यांच्याकडे काय राहिले काहीही राहिले नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक बाहेर पडलेत.

"आता कार्यालय, मैदानासाठी ते भांडण करीत आहेत,उद्या ते शिवसेना भवना साठी हाणामारी करतील. त्यांनी जो आमच्याशी दगाफटका केला त्याची फळे ते लगेच भोगत आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. आगामी जिल्हा परिषद,नगरपालिका निवडणुकीत ते दिसणारही नाहीत," असे महाजन म्हणाले.

"तीन तासांच्या दसरा मेळाव्यात सभेत काय लढाई ? कोणाकडे जास्त गर्दी होते याकडे लोकांचे लक्ष आहे. याला महत्त्व आहे. फक्त तिथे सोनिया गांधी. पवारांचे विचार मांडू नका. म्हणजे झाले. असा खोचक टोला शिंदेगटाचे आमदार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी शिवसेनेला लगावला आहे.

Minister Girish Mahajan
BMC Election : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा नवा फॅार्म्युला, लोढा अॅक्शन मोडमध्ये

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणे हा उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. एक नेता, एक मैदान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेचे शिवाजी पार्कशी भावनिक नाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कमधून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करायचे आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले तर आगामी निवडणुकीत भाजपशी लढणे त्यांना सोपे जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com