Karnataka Election : भाजपला इतक्या कमी जागा मिळतील याची अपेक्षा नव्हती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जळगावच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रचारात भाग घेतला होता.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

Girish Mahajan News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. त्याबाबत प्रचारात काय त्रुटी राहिल्या याचा अभ्यास करण्यात येईल. त्यावर उपाययोजना करण्यात येतील असे भाजप नेते, मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. (Minister Girish Mahajan said we will do self examination)

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. काँग्रेसला (Congress) अनपेक्षितपणे बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या. याबाबत भाजपच्या नेत्यांकडून अभ्यास सुरु आहे.

Girish Mahajan
New CM of Karnataka: कोण होणार कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री? 'या' दोन नावांना आहे पक्षश्रेष्ठींची पसंती

यासंदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला निश्‍चीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम्ही अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकलो नाही, याचा वरीष्ठ पातळीवर विचार करीत कारणांचा शोध घेतला जाईल. इतक्या कमी जागा आम्हाला मिळल्या आहेत. याची आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही या निकालाचे आत्मपरिक्षण करू.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या बेळगाव, निपाणी या भागातील १८ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडे होती. त्यात श्री. महाजन यांच्याकडे दहा आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे आठ मतदारसंघ होते. येथे महाजन यांच्या दहा जागांपैकी पाच जागांवर भाजप उमेदवारांचा विजय झाला. एकंदर या १८ जागांपैकी सात जागा भाजपला मिळाल्या.

Girish Mahajan
Karnataka Elections Result : कर्नाटकातील शेवटच्या जागेसाठी थरारनाट्य सुरूच; भाजप अवघ्या १६ मतांनी आघाडीवर!

गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक, जळगवा, पाचोरा, धुळे यांसह विविध भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निवडणुकीच्या प्रचाराचे व मतदार संपर्क अभियानात भाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com