प्रवीण चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट! गिरीश महाजनांची थेट पोलिसांकडे धाव

विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर आरोप करत त्याचे पुरावे विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांनी राजीनामा दिला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी महाजनांचे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवले आहे. आता या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. महाजन यांनी थेट पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, याच पोलीस ठाण्यात महाजनांवर गुन्हा दाखल आहे.

आता प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गिरीश महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या तक्रारीची नोंद झाली आहे. याच पोलीस ठाण्यात आधी महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू आहे. महाजनांच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Girish Mahajan
आमदार शेळकेंची जोरदार बॅटिंग! विधिमंडळाचे वेधले मावळकडे लक्ष

या प्रकरणी चव्हाण यांनी नुकतीच त्यांची बाजू मांडली होती. ते म्हणाले होत की, मी स्वतः हून राजीनामा दिला आहे. या सगळ्या प्रकरणातून मला बाजूला व्हायचे होते. त्यामुळे मी राजीनामा देतो. मी कोणालाही भेटलो नाही. माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तेजस मोरेने सुपारी घेऊन हे सगळे केले आहे. तेजस मोरेचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांने माझ्या ऑफिसमध्ये अनेक वेळा एसी, स्मार्ट टीव्ही लावायचा हट्ट धरला होता. रायसोनी हे कुठले ही आरोपी नाहीत. मी त्यांची केस का घेऊ? या प्रकरणामध्ये मी कधीही वकीलपत्र घेतले नाही. करोडो रुपयाची जमीन गिरीश महाजन आणि साधना महाजन यांनी त्यांच्या नावे केली. या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनची कायदेशीर वैधता तपासावी लागेल.

Girish Mahajan
ऐन उन्हाळ्यात होरपळ! वीज उपकेंद्रातील बिघाडामुळे हजारो ग्राहक अंधारात

या प्रकरणी मी कायदेशी कारवाई करणार आहे. हे षडयंत्र कोणी रचले हे समोर येईल. चौकशीमध्ये सगळ्या बाबी समोर येतील. चोर किती ही हुशार असला तरी काही ना काही मागे ठेऊन जातो. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी वारंवार तेजस मोरेला सांगितले होते. ऑफिसमध्ये येऊ नको..त्याला मला फसवायचेच होते. माझ्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरीला गेला होता, असा दावाही चव्हाण यांनी केला होता.

प्रकरण काय?

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका गुन्ह्यात अडकवून मोक्का लावण्याबाबत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचनलेल्या षडयंत्राबाबत चे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात सादर केले होते. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात प्रवीण चव्हाण यांनी सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com