नाथाभाऊ तुमच्या घरचे काय जाते..उगाच खोडा घालू नका; महाजन,खडसेंमध्ये खडाजंगी

Jalgaon : अनुभवी आणि अभ्यासू खडसेंनी मुद्देसूद उत्तरे देत सर्वांना निरूत्तर केले.
Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
Eknath Khadse, Girish Mahajan Latest Newssarkarnama

जळगाव : ‘मेडिसीनची बिले डीपीडीसीतून देतो आहे, तर देवू द्या ना, तुमच्या घरचे काय जाते. उगाच खोडा घालू नका’, या शब्दांत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी निधीबाबत आक्षेप घेणाऱ्या एकनाथ खडसे यांना सुनावले. तर महामार्ग चौपदरीकरण, तालुका क्रीडा संकुल व अन्य मुद्यांवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील, (Gulabrao patil) आमदार मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील या सर्वांनीच खडसेंना ‘टार्गेट’ केले. दरम्यान,अनुभवी खडसे (Eknath Khadse) यांनी मात्र अभ्यासू व मुद्देसूद उत्तरे देत सर्वांना निरूत्तर केले.

चिखली ते फागणेदरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या एल ॲन्ड टी कंपनीला जिल्ह्यातून कोणी पळविले त्याची चौकशी करा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.मुक्ताईनगरला क्रीडा संकुल भाडेतत्त्वावर शिक्षण संस्थेला काही वर्षांपूर्वी का दिले याचीही चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.खडसे यांनी विकासाबाबत,निधी देण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मंत्री महाजन,आमदार पाटील,आमदार चव्हाण यांनी सभेत टार्गेट करून त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. (Eknath Khadse, Girish Mahajan Latest News)

Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
एकनाथ खडसेंच्या मुलाची आत्महत्या की हत्या?; गिरीश महाजनांचा सवाल अन् राजकारण तापलं

सत्तांतरानंतरची पहिली बैठक

राज्यातील सत्तातरानंतर भाजप-शिंदे शिवसेना गटाची सत्ता आली आहे. त्यानंतर ही पहिलीच जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक (डीपीडीसी) झाली. ही बैठक खडसे गाजविणार, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे कशी खोडून काढायची याची रंगीत तालीम आधीच भाजप-शिंदे शिवसेना गटाच्या काही आमदारांनी केल्याचे सभेत दिसून आले.

जळगावातील रस्त्यांच्या विषयावरून वाद

जळगाव शहरातील रस्त्यांना डीपीडीसीतून निधी देण्याच्या प्रश्‍नावरून.निधी देऊनही शहरात रस्ते नसल्याचे ओरड आमदार राजूमामा भोळे यांनी केली.तोच मुद्दा पकडत खडसेंनी सभागृहाला माहिती दिली, डीपीडीसीतून निधी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी असतो.तो निधी शहरातील रस्त्यांसाठी दिला.मात्र रस्ते झालेले नाहीत. झाले त्याचा दर्जा निकृष्ट आहे. शहरात निधी दिला, तर ग्रामीण भागातील विकास कसा होणार, असा प्रश्‍न खडसेंनी केला.डीपीडीसीतून मेडिसीनची बिले देण्याचा विषय समोर आला असता, त्याला आमदार खडसे यांनी केव्हाची बिले आहेत, कोरोना काळातील बिले असल्याचे नियोजन अधिकारी पाटील यांनी सांगितले.ती बिले शासन देईल ना, डीपीडीसीचा निधी ग्रामीण भागासाठी वापरा, अशीही सूचना खडसेंनी दिली.

Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
निवडणूक गुजरातमध्ये, मात्र सुट्टी मिळणार महाराष्ट्रातील 'या'चार जिल्ह्यात...

महाजनांचे प्रत्युत्तर

त्यावर मंत्री महाजन म्हणाले, तुमच्या घरचे काय जाते, शासनाकडून निधी आला आहे, तो देऊ द्या ना. तुमच्या काळातही (महाविकास आघाडी) असा निधी गेला आहे. खोडा घालू नका.त्यावर हा निधी कोरोना काळातच मंजूर झाला आहे.तो आता देत असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.

चौपदरीकरण का रखडले?

तरसोद ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.ते काम का पूर्ण होत नाही, असा प्रश्‍न नाथाभाऊंना विचारला असता, त्यावर आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की जिल्ह्यात ‘एल ॲन्ड टी’ कंपनीने चौपदरीकरणाचा कंत्राट घेतला होता. मात्र, तो लोकप्रतिनिधींच्या त्रासामुळे पळून गेला, याची चौकशी करा. त्यावर खडसे म्हणाले, सखोल चौकशी करा. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.

क्रीडा संकुलावरून प्रतिस्पर्धी भिडले

मुक्ताईनगर तालुक्यात शासकीय क्रीडा संकुल तयार करावे,अशी मागणी आमदार आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.जे आहे ते खासगी शाळेच्या जागेवर आहे. त्यावर खडसे यांनी सांगितले की, तत्कालीन शासनाने क्रीडा संकुल शिक्षण संस्थेकडून काही वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे.त्यामुळे नवीन क्रीडा संकुलाची गरज नाही.त्यावर आमदार पाटील यांनी शासकीय क्रीडा संकुल करायला पाहिजे, भाड्याने घेतलेले रद्द करता येते, असा मुद्दा मांडला. त्यावर खडसे म्हणाले, हे आम्हाला माहीत नव्हते, तेव्हा आम्ही लहान होतो.आता तुमच्याकडून माहीत झाले, असा टोला लगावला.

पोलीस निरिक्षक सादरेंचे काय झाले?

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी नाशिक येथे आत्महत्या केली होती.तो जुना विषयही सभेत उकरून काढण्यात आला.अवैध वाळूच्या विषयावर चर्चा सुरू असताना, आमदार मंगेश चव्हाण यांनी अशोक सादरे यांनी वाळूमाफियांकडून आलेल्या धमक्यामुळे आत्महत्या केली होती. तो वाळूमाफिया कोणाचा समर्थक होता, याची चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in