भाजपचा राज्यसभेचा तिसरा उमेदवार निवडून येणारच!

भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार विजयी होईल असा दावा केला.
भाजपचा राज्यसभेचा तिसरा उमेदवार निवडून येणारच!
Girish MahajanSarkarnama

जळगाव : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते बिथरले आहेत. त्यांची हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे. आमची रणनीती पक्की झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे (BJP) धनंजय महाडीक विजयी होणारच, हे आपण खात्रीशीर सांगत आहोत, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. (BJP`s Girish Mahajan said our Third candidate will win rajyasabha election)

Girish Mahajan
पोलिस आयुक्तांनी उधळला पेटवापेटवीचा डाव!

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने तिघांवर सोपविली आहे. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश आहे. यासाठी महाजन यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लहान पक्ष व काही अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत, आमच्याकडे तिसरा उमेदवार जिंकण्याइतके पुरेसे संख्याबळ आहे.

Girish Mahajan
जयंत पाटील म्हणाले, तुमचे प्रश्न सोडविणार!

आपण छातीठोकपणे सांगू शकतो की आमचा तिसरा उमेदवार विजयी होणारच. शिवसेनेचे आमदारच त्यांच्यावर नाराज आहेत. ते आता जाहीरपणे मंत्री टक्केवारी घेत असल्याची टीका करीत आहेत, घटक पक्षातील बच्चू कडू, अबू आझमी नाराज आहे. त्या मुळे आता महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसत आहे. त्यासाठी आता हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता आपल्याच आमदारांवर भरोसा राहिलेला नाही. आमचा विजय निश्चित असून, राज्यांतील बदलाची ही नांदी असेल, असा आपला ठाम विश्वास आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in