'महाराष्ट्र बंद'चा निर्णय राजकीय हेतूने ; भाजपचा आरोप
Girish Mahajansarkarnama

'महाराष्ट्र बंद'चा निर्णय राजकीय हेतूने ; भाजपचा आरोप

लखीमपूर खिरी घटनेवरुन महाराष्ट्रात बंद (Maharashtra bandh) करण्याचा निर्णय घेणे या मागे राजकारण आहे. व्यापारी वर्ग कोरोनामुळे आधीच त्रस्त आहेत. अशावेळी महाराष्ट्र बंदच्या हाकेला कोणी हाक देणार नाही,'' असे महाजन (Girish Mahajan)यांनी सांगितले.

नाशिक : 'राज्य सरकारने ओबीसी समाजावर मोठा अन्याय केल्या असल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत केला. ''ओबीसी समाज एकत्र झाला तर महाविकास आघाडी सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,'' असे महाजन म्हणाले.

''ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने तांत्रिक बाबी पूर्ण न केल्यामुळे त्याचा फटका ओबीसी समाजाला बसला. राज्यात तुमचे सरकार असताना ही वेळ का आली,'' असा सवाल महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांचे नाव न घेता केला. ''राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अजून शेतकऱ्यांना मदत केलेली दिसत नाही. शेतकरी संपुष्टात आलेली आहे. लखीमपूर खिरी घटनेवरुन महाराष्ट्रात बंद (Maharashtra bandh) करण्याचा निर्णय घेणे या मागे राजकारण आहे. व्यापारी वर्ग कोरोनामुळे आधीच त्रस्त आहेत. अशावेळी महाराष्ट्र बंदच्या हाकेला कोणी हाक देणार नाही,'' असे महाजन (Girish Mahajan)यांनी सांगितले.

Girish Mahajan
किशोरीताई, एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा ; राणेंचा खोचक टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील प्राप्तिकर विभागाच्या कारवाईबाबत महाजन म्हणाले, ''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत मत व्यक्त केल्याने प्राप्तिकर विभागाने कारवाई केली. हे त्याचे म्हणणं चुकीचे आहे. असे काहीही नाही. या कारवाईबाबत लवकर सत्य समोर येईल,''

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंबाबत (Eknath Khadse) महाजन म्हणाले की, त्यांच्यामागे खूप बहुमत नाही. पूर्वीपासून ते काठावर निवडून येतात. कोणाल दोष देऊन काय उपयोग. दोन वर्षानंतर त्यांना कळेल मी त्यांचा पराभव केल्याचे त्यांना दोन वर्षानंतर कळेल. शिवसेनेत गेलेले अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, त्याच्या भाजप प्रवेशाबाबत अजून विचार झालेला नाही.

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. सुरुवातीला या बंदला व्यापारी वर्गातून विरोध सुरु होता. पण आता व्यापारी वर्ग देखील या बंदमध्ये सहभागी होत आहे. पुणे, मुंबईतील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. आजच्या बंदमध्ये सर्व व्यापारी वर्ग हे दुपारी 4 वाजेपर्यंत बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.