Dada Bhuse; भाजप नेत्यांकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर स्तुतीसुमने

भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केला भाजपतर्फे विशेष सत्कार
Dada bhuse with Dr. Subhsh Bhamre
Dada bhuse with Dr. Subhsh BhamreSarkarnama

मालेगाव : (Malegaon) गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे (BJP) स्थानिक नेते आणि आमदारांचा पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याशी जमत नव्हे. त्याबाबतचे मतभेद जाहीर झाले होते. मात्र काल धुळ्याचे भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी श्री. भुसे यांचा सत्कार करीत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भुसे हे सर्व गुण संपन्न नेते आहेत, असे विधान त्यांनी केल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या. (BJP leaders falicitate Guardian Minister Dada Bhuse in Malegaon)

Dada bhuse with Dr. Subhsh Bhamre
Election News; पदविधर निवडणुकीमुळे ४१३ कोटींच्या कामांना ब्रेक

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांना मिळाले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना गिरीश महाजन यांची संधी हुकल्याने ते नाराज झाले होते. तेव्हापासून भाजपचे नेते सतत पालकमंत्र्यांपासून फटकून वागत होते. त्यांच्यातील मतभेद अनेकदा जाहीर झाले होते. अशा स्थितीत भाजप आणि पालकमंत्री भुसे यांच्यात समन्वयाची चर्चा सुरु झाली आहे.

Dada bhuse with Dr. Subhsh Bhamre
Deven Bharti : फडणवीस हे समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करताहेत ; देवेन भारतींच्या नियुक्तीवर काँग्रेसचा आक्षेप

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंच्या विचाराने प्रेरित झालेल्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बिघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती निर्माण करून राज्यात परखड हिंदुत्ववादी विचारांचे सरकार स्थापन केले. जनतेने ज्यांना मतदानातून कौल दिला ते जनतेच्या मनातील सरकार अखेर अस्तित्वात आले. यात सर्वसामान्यांचे सर्व गुण संपन्न नेतृत्व दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील व शहराचे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्‍वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथे व्यक्त केला.

येथील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री भुसे यांचा भाजपतर्फे मंगळवारी (ता. ३) सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष निलेश कचवे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भामरे म्हणाले, की तालुक्याच्या शिरपेचात भुसेंच्या रूपाने मानाचा तुरा रोवला गेला. भुसे हे सर्वसमावेशक नेते असल्यामुळे त्यांच्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांशी कायम सलोख्याचे संबंध राहिले. सुदैवाने राज्यात शिंदे गट व भाजप यांची सत्ता स्थापन झाल्यामुळे परत भुसे व भाजप मधील सलोख्याचे संबंध भक्कम झालेत. यापूर्वी राज्यात २०१९ च्या विधासभेत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक आघाडी करून सरकार स्थापन केले. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. सरकारमध्ये कुठलाही समन्वय नव्हता. त्यामुळेच सत्तापालट झाले. शहरातील शिवपुराण कथेमुळे मालेगाव शिवमय झाले. राज्यात श्री. भुसे व शहराचा नावलौकिक झाला.

यावेळी दादा जाधव, संजय दुसाने, मनोहर बच्छाव, लकी गिल, नंदूतात्या सोयगावकर, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, सुनील देवरे, शशी निकम, विनोद वाघ, डॉ. मिलिंद पवार, डॉ. दीपक जाधव, मुकेश झुनझुनवाला, प्रमोद निकम, संभाजी कापडणीस, धनंजय पवार, योगेश देसले, कमलेश निकम, शंकर काळे, ज्ञानेश्वर कदम, मच्छिंद्र जगताप, संदीप निकम, रवींद्र निकम, संदीप दिघे, डॉ. योगेश पवार, पोपट निकम, पंकज कासार, राहुल कानडे, प्रल्हाद वानखेडे, केदा निकम, धीरज निकम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com