शिवसेनेच्या बंडामागे देवेंद्र फडणवीस असल्याचे उघड : जयंत पाटलांचा घाणाघात

राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टीका होते, याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो, ही भीती असल्याने सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

शिर्डी : शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले, हे जाहीरपणे सांगतात. यावरून या बंडामागे कोण होतं, हे लक्षात येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर केली. (BJP leader Devendra Fadnavis behind Shiv Sena revolt : Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रवादी मंथन...वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून (ता. ४ नोव्हेंबर) शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते.

Jayant Patil
शिर्डीच्या सभेला शरद पवारांची ऑनलाईन उपस्थिती!

पाटील म्हणाले की, आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टीका होते, याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो, ही भीती असल्याने सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २३ वर्ष झाली आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार या शिबिराला येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करणार आहेत.

Jayant Patil
सत्तेत असतानाच शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या हालचाली सुरु होत्या; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत व अस्वस्थ आहे, याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले, हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

Jayant Patil
विलासराव देशमुखांच्या तालमीत तयार झालोय : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची कबुली

शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह निमंत्रित उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in