भाजपच्या चित्रा वाघ यांची स्वतंत्र तपास यंत्रणा?

चित्रा वाघ यांनी विविध शासकीय कार्यालयांत बंद दाराआड केलेल्या चौकशीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रवक्त्या तसेच आपल्या ट्वीटमुळे समाज माध्यमांतून (Social Media) सतत चर्चेत असणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची काल शहरात वेगळीच चर्चा होती. गेले तीन दिवसांपासून शहरात (Nashik) तळ ठोकलेल्या वाघ यांनी काल काही शासकीय कार्यालयात (Government Offices) जाऊन अधिकाऱ्यांकडे बंद दाराआड माहिती घेतली. (BJP well known leader Chitra Wagh ask information on nameless complain in Nashik)

Chitra Wagh
Eknath Shinde : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पुण्यातील प्रवाशांनी मानले मुख्यमत्र्यांचे आभार !

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडे विविध तपास यंत्रणा आहेत. त्यात आता चित्र वाघ यांच्या यंत्रणेची भर पडल्याची चर्चा होती. त्यामुळे वाघ यांचा दौरा गाजतो आहे.

Chitra Wagh
Rutuja Latake : लटकेंच्या राजीनाम्यावर आज निर्णय ; ठाकरे गट गॅसवर, भाजपची 'वेट अँड वॉच' ची भूमिका

सौ. वाघ या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. त्यांच्याकडे सध्या तरी कोणतेही संवैधानिक पद नाही. अशा स्थितीत त्यांनी विविध कार्यालयांत जाऊन तपास केला?. त्यांना नेमकी काय माहिती हवी होती?. याचा नेमकी माहिती मिळू शकली नाही. सौ. वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

यासंदर्भात सौ. वाघ यांच्या समवेत काही भाजपचे नेते देखील होते. यात महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, सौ. वाघ यांना एका महिलेने निनावी पत्र लिहिले आहे. त्यात पदोन्नती करताना त्या महिलेवर अन्याय झाल्याचे समजते. यात काही अधिकारी गुंतलेले आहेत. त्यांची नावे मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक- दोन दिवसांत त्यातील नावे पुढे येतील, असा दावा त्यांनी केला.

सौ. वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल जिल्हा परिषदेत, विभागीय महसूल आयुक्त तसेच महापालिकेच्या कार्यालयात जाऊन विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना विविध माहिती विचारली. त्यांच्या समवेत असलेले नेते देखील अधिकाऱ्यांना माहिती विचारीत होते. त्याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी दार बंद करण्यात येत असल्याने अन्य कर्मचाऱ्यांची उत्सुकता ताणली जात होती. त्यामुळेच या भेटीची बदक्या आवाजात चर्चा होती.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com