OBC Reservation; छगन भुजबळ केवळ ढोंग करत राहिले; आरक्षण आम्हीच दिले!

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते ओबीसी आरक्षणाबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSarkarnama

नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मनात काहीही असो, त्यांच्या दोन्ही नेत्यांच्या मनात मात्र ओबीसी (OBC reservation) आरक्षणाविषयी चांगल्या भावना नव्हत्या. छगन भुजबळ हे मोर्चे, आंदोलने करीत ओबीसी समाजाची दिशाभूल करीत राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या प्रयत्नाला यश आल्यानेचे ओबीसी आरक्षण मिळाले, असा दावा भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला. (Mahavikas Front Government didn`t done anything for OBC reservation)

Chandrashekhar Bavankule
नवा आदेश, नवीन पालकमंत्री येईपर्यंत कामे थांबवा!

श्री बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते ओबीसी आरक्षणाबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व न्यायालयात २७ टक्के आरक्षण मिळावे यासाठी न्यायालायत गेलो. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हे आरक्षण योग्य नाही, असे सांगून ते न्यायालायत गेले. एव्हढेच नाही तर त्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील गेले, असा आरोप त्यांनी केला.

Chandrashekhar Bavankule
दोन आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद

श्री. बावनकुळे म्हणाले, आम्ही मात्र सॉलिसिटर जनरल यांना सांगून उच्चस्तरीय वकील नियुक्त केले. त्यामुळेच म्हणून ओबीसी आरक्षण मिळाले. मात्र महाविकास आघाडी सरकार येताच पुन्हा फडणवीस सरकारने काढलेला अध्यादेश जाणीवपूर्वक लॅप्स होऊ दिला. काहीही केले तरी, आमच्या प्रयत्नाने पुन्हा आरक्षण ओबीसींना मिळाले आहे हे आमचं श्रेय आहे. अन्य कोणीही हे श्रेय घेऊन दिशाभूल करू नये.

भुजबळ हे केवळ आंदोलने मोर्चे काढून ढोंग करत राहिले, असा आरोप श्री. बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीने १५ महिन्यात काहीही केले नाही, म्हणूनच सर्वोच न्यायालयाने `ओबीसी` आरक्षण रद्द केले. `ओबीसी`आरक्षणाचा सर्व्हे करण्यासाठी ४३५ कोटींचा निधी लागणार होता. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव नामंजूर करत शासनाने निरगुडे आयोग रद्द केला होता. आमच्या दबावामुळे बांठीया आयोग स्थापन केला.

महाविकास आघाडीला `ओबीसी` आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या होत्या, असा आरोप देखील त्यांनी केला. ते म्हणाले, भुजबळ यांच्या मनात `ओबीसी` घटकांविषयी काहीही भावना असोत, त्याच्या सरकारमधील दोन नेत्यांना मात्र ते नको होते. `ओबीसी` जागांवर इतर धनदंडग्यांना बिल्डरांना आणून निवडूण आणायचे असा महाविकास आघाडीचा डाव होता.

त्यांच्या नेत्यांच्या मनात पाप

भुजबळ नव्हे, तर त्यांच्या नेत्यांच्या मनात ओबीसींविरुद्ध पाप होते. माजी मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच ओबीसी आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ट्रॅपमधून बाहेर आले तर त्यांचे अस्तित्व थोडे फार टिकेल. मंत्रिमंडळाची रचना हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, ते ठरवतील तेव्हा मंत्रीमंडळ अस्तित्वात येईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com